जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'रिव्ह्यू वाचून काही फायदा...'; हे काय बोलून गेली Alia Bhatt आणि का?

'रिव्ह्यू वाचून काही फायदा...'; हे काय बोलून गेली Alia Bhatt आणि का?

alia bhatt

alia bhatt

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने देशभरात जवळपास 300 कोटींची कमाई केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने देशभरात जवळपास 300 कोटींची कमाई केली आहे. जगभरातून लोक या चित्रपटावर प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटावर आलेल्या रिव्ह्यूवर आलियानं नुकतंच एक वक्तव्य केलं. हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर लोक वेगवेगळ्या प्रकारचे रिव्ह्यू देत आहेत. याविषयी बोलताना आलिया म्हणली, ‘मी पुनरावलोकने वाचत नाही. चित्रपटाबद्दल काही चांगले बोलले गेले असतानाही. वाईट म्हटलं तरी वाचत नाही. रिव्ह्यू वाचून काही फायदा नाही. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची विचारसरणी असते. आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो हिट होणार की नाही हे त्याच्या चर्चांवरुन कळते’. आलिया म्हणाली की ती लोकांकडून तिचा फीडबॅक घेते. ती फक्त काय काम केले आणि काय नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करते. हेही वाचा -  ‘सुकेशकडून 3 कोटी रुपये…’; Jacqueline Fernandez च्या स्टायलिस्टचा मोठा खुलासा आलिया पुढे म्हणाली, ‘करण जोहरला चित्रपटांचे रिव्ह्यू वाचायला आवडतात. चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, असे त्याला वाटते. कारण जर कोणी समीक्षा लिहिली तर त्याचा अर्थ तो आपले प्रामाणिक मत मांडत आहे’. आलियाचं हे वक्तव्य सध्या चर्चेता विषय ठरत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, चित्रपटाला मिळालेल्या या प्रतिसादानंतर ट्रेड अॅनालिस्ट्सचे मत आहे की हा चित्रपट लवकरच 250 कोटींचा आकडा गाठू शकतो. सध्यातरी शनिवार आणि रविवारच्या कमाईच्या आकड्यांची वाट पाहावी लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात