मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘हा चित्रपट करू नकोस, करिअर संपेल’; विवेक ऑबेरॉयला मिळाला होता इशारा

‘हा चित्रपट करू नकोस, करिअर संपेल’; विवेक ऑबेरॉयला मिळाला होता इशारा

"नेपोटिझम हा आता मोठा शब्द बनला आहे. पण पुर्वी हा खूप साधा शब्द होता. मी न्यूयार्क वरून शिकून परतल्यानंतर बाबांनी माझ्या पदार्पणाची पूर्ण तयारी केली होती... " विवेक ने सांगितला अनुभव

"नेपोटिझम हा आता मोठा शब्द बनला आहे. पण पुर्वी हा खूप साधा शब्द होता. मी न्यूयार्क वरून शिकून परतल्यानंतर बाबांनी माझ्या पदार्पणाची पूर्ण तयारी केली होती... " विवेक ने सांगितला अनुभव

"नेपोटिझम हा आता मोठा शब्द बनला आहे. पण पुर्वी हा खूप साधा शब्द होता. मी न्यूयार्क वरून शिकून परतल्यानंतर बाबांनी माझ्या पदार्पणाची पूर्ण तयारी केली होती... " विवेक ने सांगितला अनुभव

मुंबई, 18 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेरॉय (Vivek Oberoi) हा एक स्टारकिड असूनही त्याला अनेक संघर्ष करावे  लागले होते. तर वडील अभिनेते सुरेश ऑबेरॉय (Suresh Oberoi) यांची मदत न घेता त्याने चित्रपटात काम मिळवलं होतं. सुरेश ऑबेरॉय यांना विवेक ला एका मोठ्या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये आणायचं होत व त्यासाठी त्यांनी सगळी तयारी देखिल केली होती. पण विवेक ने स्वत:च चित्रपट मिळवून त्यात काम करण्याचा निर्णय घेतला. राम गोपाल वर्मांच्या ‘कंपनी’ (company)  या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तर ऑडीशन देऊन त्यानंतर चित्रपटातील पात्रासाठी मेहनत घेतल्यानंतरच त्याला चित्रपटात घेण्यात आलं होत. तर या चित्रपटासाठी आपण तब्बल तीन आठवडे झोपडपट्टीत घालवले असल्याचंही त्याने नुकतच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

विवेकला आता बॉलिवूड मध्ये दोन दशकं पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्याने कंपनी चित्रपटातील चंदू या पात्रापासून ते ‘साथिया’ (Sathiya) च्या आदित्य पर्यतचा आपला प्रवास सांगितला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने नेपोटिझमवरही भाष्य केल आहे, "नेपोटिझम हा आता मोठा शब्द बनला आहे. पण पुर्वी हा खूप साधा शब्द होता. मी न्यूयार्कमध्ये शिकून परतल्यानंतर बाबांनी माझ्या पदार्पणाची पूर्ण तयारी केली होती. दिग्दर्शक अब्बास मस्तानच्या चित्रपटातून मी डेब्यू करणार होतो. पण मला हे ठीक वाटत नव्हतं. माझ्या बाबांनी स्वत: मेहनत करून त्यांच नाव मोठं केलं होत. आणि मलाही तसंच काहीस करायच होतं. पण चित्रपट नाही चालला तर त्यांची सगळी मेहनत वाया जाईल, मी रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी अब्बास मस्तान यांना चित्रपटासाठी नकार दिला". विवेक म्हणाला.

निर्मात्यांनी केली मोठी घोषणा; रणबीर नव्हे या अभिनेत्यासोबत आलिया करणार रोमान्स

त्यानंतर फार कष्टाने त्याला कंपनी चित्रपटात काम मिळालं अस त्याने सांगितलं. कंपनी नंतर त्याला साथिया या चित्रपटाची ऑफर मिळाली. पण विवेकचे मेंटर राम गोपाल वर्मा यांनी विवेकला हा चित्रपट करू नकोस असं म्हटलं. तर हा करिअरसाठी घातक ठरेल असही त्यांनी म्हटलं होतं. कारण कंपनी चित्रपटानंतर प्रत्येकजन विवेकला अँक्शन चित्रपटात पाहू इच्छित होता. पण एक अभिनेता म्हणून त्याला निरनिराळ्या भूमिका साकारायच्या होत्या. त्यामुळे त्याने साथिया चित्रपट निवडला. आणि चित्रपट हिट देखिल ठरला. या चित्रपटानंतर मनिरत्नम यांनीही विवेकचं कौतुक केल होत व युवा या चित्रपटात संधी दिली होती.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Vivek oberoi