मुंबई, 30 ऑक्टोबर : बॉलिवूडच्या एका अभिनेत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून असा दावा केला आहे की, तो ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाणी ती सोसायटी मुस्लिम लोकांची असल्यानं या लोकांनी त्याला दिवाळी साजरी करण्यापासून रोखलं आहे. मात्र यावर पोलिसांनी मंगळवारी यात हिंदू-मुस्लिम असा वाद नसल्याचं म्हटलं आहे. पटनाचे रहिवासी असलेले विश्व भानू हे फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एन्टरटेनमेंटसाठी काम करतात. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून दावा केला होता की, त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या घरासमोरील दिवे विझवायला आणि रांगोळी जबरदस्तीनं पुसून टाकायला लावली. KBC11 : शिक्षिका असूनही देऊ शकली नाही या सोप्या प्रश्नाचं उत्तर, जिंकले इतके लाख विश्व भानू यांनी शनिवारी केलल्या त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘मी मुंबईतील मलाच्या मालवणी या भागातील एका मुस्लिम सोसायटीमध्ये राहतो. मागच्या वर्षी प्रमाणं या वर्षीही या सोसायटील लोकांनी घराची रोशनाई करण्यासाठी लावलेले दिवे विझावण्यासाठी माझ्या पत्नीसोबत वाद घातला. हे लोक माझ्या पत्नीला दिवे लावू देत नाहीत तसेच रांगोळी काढण्यासही मनाई करत आहेत. त्यांनी आमच्या लाइट्स तोडल्या आणि इतर लाइट्स काढून टाकण्यास सांगितलं.’ विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे. दिवाळीचं सेलिब्रेशन करताना ‘या’ अभिनेत्रीच्या लेहंग्याला लागली आग, थोडक्यात बचाव
@narendramodi I am living in a muslim society and tonight people of the society stopped my wife from lighting up and making Rangoli to celebrate diwali at my Mumbai residence. They destroyed the lights, broke the wires and the crowd forced me to remove the lights.
— Vishwa Bhanu (@vishwbhanu) October 26, 2019
अक्षय कुमारच्या ‘स्पेशल 26’, ‘मर्दानी’ आणि ‘रघु रोमियो’ या सिनेमांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्यानं या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे. याशिवाय त्यानं उपनगरीय मलाडपोलिस स्टेशनमध्ये संपर्क करत याबाबत तक्रार केली आहे. पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक जगदेव कलपद यांनी याविषयी बोलताना, हा हिंदू-मुस्लिम वादाचा मुद्दा नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच हा सांप्रदायिक वादाचा मुद्दा असल्याचंही त्यांनी नाकारलं. तसेच हे प्रकरण शांततापूर्ण पद्धतीनं सोडवलं जाईल असं पोलिसांनी सांगितलं.
रिंकू राजगुरूचे दिवाळी सेलिब्रेशन; साडीतील फोटो पाहून चाहते झाले घायाळ!
========================================================================== SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही…शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

)







