सलमान खानच्या चाहत्यांसाठी GOOD NEWS, ईदला ‘राधे’ येणार भेटीला

सलमान खानच्या चाहत्यांसाठी GOOD NEWS, ईदला ‘राधे’ येणार भेटीला

‘ईद का वादा किया था ईद पर ही आयेंगे’, बहूप्रतिक्षित चित्रपट ‘राधे - युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : कोरोना तसेच लॉकडाउनमुळे अनेक चित्रपटांच प्रदर्शन रखडलं आहे. पण अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांना एक सुखद धक्का मिळाला आहे. सलमानचा बहूचर्चित आणि बहूप्रतिक्षित चित्रपट ‘राधे - युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe – Your most wanted bhai) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द सलमान खान ने ‘ईद का वादा किया था ईद पर ही आयेंगे’ अशी पोस्ट करत राधेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. पण त्यानंतर मात्र लॉकडाउन करण्यात आल्याने प्रेक्षकांच्या आशा मावळल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा चित्रपट भेटीला येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अभिनेता सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. येत्या ईदला म्हणजेच 13 मे 2021 ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ओटीटीसह अन्य प्लॅटफॉर्मवर जगभरात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षभरापासून चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होता पण लॉकडाउनमुळे चित्रपटाच्या तारखा रद्द होत होत्या. अखेर आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

झी फाय (Zee5) या प्लॅटफॉर्मच्या झी प्लेक्स (zee plex) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट दिसणार आहे. याच्या सहीत आणखी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट दिसणार आहे. DTH ऑपरेटर म्हणजेच डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल यावरही चित्रपट पाहता येणार आहे. यामुळे प्रेक्षकांना आपल्या घरातच सुरक्षितरित्या चित्रपट पाहता येणार आहे.

हे वाचा - प्रसादाच्या थाळीत कांदा का?; अभिनेत्री कंगणा रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर

‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani), जॅकी श्रॉफ (Jacky Shroff), रणदीप हुडा (Randeep Hooda) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची सलमान खान फिल्म्स (SKF) आणि झी स्टुडिओजने (zee studios)  मिळून प्रस्तुती केली आहे. तर सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Published by: News Digital
First published: April 21, 2021, 6:09 PM IST

ताज्या बातम्या