मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर रितेश जेनेलियानं खरेदी केली नवी कोरी BMW;किंमत वाचून व्हाल थक्क

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर रितेश जेनेलियानं खरेदी केली नवी कोरी BMW;किंमत वाचून व्हाल थक्क

अभिनेता रितेश देशमुखनं गणेशचतुर्थीच्या मुहुर्तावर घरी नव्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेता रितेश देशमुखनं गणेशचतुर्थीच्या मुहुर्तावर घरी नव्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेता रितेश देशमुखनं गणेशचतुर्थीच्या मुहुर्तावर घरी नव्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  01 सप्टेंबर : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. बायको जेनेलिया आणि रितेश यांची कमाल बॉडिंग नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळत असतं.  रितेश आणि जेनेलिया आपल्या मुलांबरोबर सगळे सण मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. यावेळी गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून या गोड ट्रेंडिंग कपलनं घरात नव्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. रितेश जेनेलियानं गणेश चतुर्थीच्या दिवशी नवी कोरी BMW कार खरेदी केली. कार घरी आणून तिची पुजा केली. कारचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले असून नव्या कारसाठी चाहते दोघांचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

रितेश आणि जेनेलिया यांनी 2012मध्ये लग्न केलं. 11 वर्ष एकमेकांना डेट करणाऱ्या या कपलं लग्नानंतरही त्यांचं बॉडिंग जपून ठेवलं. आज दोन मुलांचे पालक असलेलं  हे कपल सोशल मीडियावर सॉलिड रोमँटिक होतान दिसत असतं. दोघांनी एकमेकांना खंबीर साथ देत आयुष्यातील चढ उतारांना तोंड दिलं आहे. सोशल मीडियावरही दोघांना भरपूर प्रेम मिळत आहे.

या कपलनं या गणपतीत नवी कोरी BMW ix खरेदी केली आहे. नवी कार घेऊन हे कपल आपल्या दोन्ही मुलांबरोबर अर्पिता खान शर्माच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलं. नव्या कारनं सर्वांचं लक्ष वेधलं.

हेही वाचा - Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सवासाठी बहिणीच्या घरी पोहोचला सलमान खान,आरतीचा VIDEO आला समोर

बॉलिवूड शादी डॉटकॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, रितेश जेनेलिया यांनी खरेदी केलेली नवी BMWची किंमत जवळपास 1.5 करोड रुपये आहे. ही कार इलेक्ट्रिक कार असून दोघांची ही दुसरी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. याआधी त्यांनी  लाल रंगाची टेस्ला मॉडल एक्स कार खरेदी केली होती.

रितेशकडे शानदार कारचं कलेक्शन आहे. अभिनेत्याला कारची भयंकर आवड आहे. रितेशकडे मर्सिडीज बेंज पासून रेंज रोवर पर्यंत महागड्या कार आहेत.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Ganesh chaturthi, Marathi entertainment