मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सवासाठी बहिणीच्या घरी पोहोचला सलमान खान,आरतीचा VIDEO आला समोर

Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सवासाठी बहिणीच्या घरी पोहोचला सलमान खान,आरतीचा VIDEO आला समोर

 देशभरात सध्या गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रेटीपर्यंत सर्वांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.

देशभरात सध्या गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रेटीपर्यंत सर्वांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.

देशभरात सध्या गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रेटीपर्यंत सर्वांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 1 सप्टेंबर - देशभरात सध्या गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रेटीपर्यंत सर्वांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. अनेक कलाकारांनी आपल्या घरी थाटामाटात बाप्पाची स्थापना केली आहे. दरम्यान बॉलिवूड भाईजान सलमान खान बहीण अर्पिता खानच्या घरी गणेशपूजेसाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. बाप्पाची आरती करतानाचा सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमान खानने गणेश चतुर्थीला गणरायाची पूजा केली. मुंबईतील वांद्रे याठिकाणी सलमानची बहीण अर्पिता खान आणि अभिनेता आयुष शर्मा यांच्या घरी गणेश चतुर्थीसाठी ग्रँड सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये फक्त सलमान खानच नव्हे तर कतरिना कैफ, विकी कौशल, रितेश देशमुखसह अनेक स्टार्स अर्पिताच्या घरी पोहोचले होते. त्यांचे काही व्हिडीओ आणि सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

अभिनेता सलमान खानने बुधवारी रात्री बहीण अर्पिताच्या घरातील एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, अभिनेत्यानं पांढरा शर्ट आणि निळी डेनिम्स घातली आहे. व्हिडीओमध्ये सलमान हातात आरतीचं ताट घेऊन बाप्पाची आरती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की सलमान उपस्थित असलेल्या बालचमूंना आरतीसाठी पुढे येण्यास सांगत आहे. आणि नंतर स्वतः गणरायाची आरती करायला सुरुवात करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड पसंत केला जात आहे.

(हे वाचा:Ganesh Chaturthi 2022: अमृता रावने बाप्पाकडे केला होता खास नवस, पूर्ण होताच पोहोचली कर्जत मंदिरात )

सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येताच, सलमान खानचे चाहते आणि सेलिब्रेटी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. काही चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्याला खरा स्टार म्हटलं आहे. तर काहींनी अभिनेत्यानं सिद्ध केलं की परमेश्वर एकच असतो असं म्हटलं आहे. अशा अनेक कमेंट्स सध्या या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Ganesh chaturthi, Salman khan