Home /News /entertainment /

हुमा कुरेशीनं हॉलिवूडमध्ये केलं पदार्पण; Army of the Dead चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

हुमा कुरेशीनं हॉलिवूडमध्ये केलं पदार्पण; Army of the Dead चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री हुमा कुरेशी हॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहे. तर तिच्या नव्या चित्रपटाचं ट्रेलर देखिल प्रदर्शित झालं आहे.

  मुंबई, 14 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress)  हुमा कुरेशी (Huma Qureshi) लवकरच एका हॉलिवूड चित्रपटात (Hollywood film) दिसणार आहे. नुकतेच चित्रपटाचं ट्रेलर ही प्रदर्शित झालं आहे. दिग्दर्शक, निर्माता जॅक स्नाइडर (Jack Snyder) याच्या 'आर्मी ऑफ द डेड' (Army Of The Dead) या चित्रपटात हुमा दिसणार आहे. हुमा ने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती दिली. तसेच ट्रेलर ही पोस्ट केलं. हुमा सोबत एला पुर्नेल, ओमारी हार्डविक, ब्यूटिस्टा, एना डे ला रेगुएरा, थियो रोसी, मैथियस श्वेघोफर, नोरा अरनेजर, हिरोयुकी सनाडा आदी कलाकार स्क्रिन शेअर करणार आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

  'आर्मी ऑफ द डेड' या चित्रपटातून हुमा हॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे बॉलिवूड मधून देखिल हुमावर कौतुकाचा वर्षाव होतान दिसत आहे. फराह खान (Farah khan) , आकांशा रंजन कपूर, भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांनी हुमा ट्रेलर शेअर करत हुमा ला शुभेच्छा दिल्या. याशिवाय हुमाच्या चाहत्यांकडून देखिल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

  अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियावर तिच्याच कुत्र्याने केला हल्ला; VIDEO VIRAL

  हुमाचा पहिलाच हॉलिवूड चित्रपट असून हा एक झोम्बी थ्रिलर चित्रपट आहे. हुमाच्या पात्राबद्दल अजून जास्त माहिती सांगण्यात आली नसल्याचं हुमाने सोशल मीडियावरून सांगितलं आहे. याशिवाय ट्रेलर शेअर करत तिने कॅप्शन देखिल दिलं आहे. जॅक स्नाइडर शी नेहमीच एक फॅन आणि मैत्री असल्याचा मला गर्व आहे. या चित्रपटाचा लहानसा भाग असल्याचा मला अभिमान आहे. या चित्रपटात हुमा गीता नवाच्या महिलेची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 21 मे ला चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटगृह तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform)  चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हुमा शिवाय आणखीनही बॉलिवूड अभिनेते हॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहेत. नुकतच फरहान अख्तरचं (Farhan Akhtar) मार्वेल स्टुडिओज सोबत काम करणार असल्याचं वृत्त समोर आलं होत. तर अभिनेता धनुश (Dhanush) सुद्धा रुसो ब्रदर्सच्या ‘द ग्रे मॅन’ (The Grey Man)  या चित्रपटात दिसणार आहे. याबरोबरच अभिनेत्री प्रियंका चोप्रा ‘मॅट्रिक्स 4’ (Matrix 4)  या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता अली फजल (Ali Fazal) 'द डेथ ऑन द नाइल' या चित्रपटात एक पात्र साकारत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Hollywood

  पुढील बातम्या