Home /News /entertainment /

MPSC विध्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्रवीण तरडेचा संताप; म्हणाला, जगणार फक्त राजकारणी

MPSC विध्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्रवीण तरडेचा संताप; म्हणाला, जगणार फक्त राजकारणी

पुण्यातील (Pune) MPSC च्या एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या करत सर्वांनाचं हादरवून सोडलं आहे.

    मुंबई, 5 जुलै-  पुण्यातील (Pune)  MPSC च्या एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या करत सर्वांनाचं हादरवून सोडलं आहे. स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या तरुणाने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. तो पुण्यातील फुरसुंगी भागात राहात होता. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही अजून मुलाखत होतं नसल्याने तो नैराश्यात होता. गेली दोनवर्षे तो मुलाखतीची वाट बघत होता. मात्र कोरोना काळामध्ये सतत रखडलेल्या वेळापत्रकाला तो कंटाळला होता. घरची परिस्थिती आणि MPSC चं रखडलेलं वेळापत्रक याला कांटाळून त्यानं इतक्या टोकाचं पाऊल उचललं आहे. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर सर्व माध्यमातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत आहेत. अशातच ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता प्रवीण तरडेनं (Pravin Tarade) सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे. नुकताच साम टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीणनं आपला अनुभव सांगितला आहे, त्यांनी म्हटलं आहे, ‘1997 आणि 2000 च्या दरम्यान मीसुद्धा MPSC ची तयारी करत होतो. मात्र त्यावेळी सलग 2 वर्षे पेपर फुटत होता. तसेच त्या मुलाचं कष्ट मी जवळून पाहिलं आहे. ते हॉस्टेलवरच राहणं आणि कित्येकवेळा फक्त एकवेळच्या जेवणावरचं दिवस काढावा लागत असे’. (हे वाचा:सुबोधच्या पत्नीने शेयर केला थ्रोबॅक PHOTO; 15 वर्षांपूर्वी असं दिसायचं हे कपल  ) तसेच त्यांनी म्हटल आहे, परीक्षा वेळापत्रक जोपर्यंत माहिती असतं तोपर्यंतचं मुलांकडे जेवायला पैसे असतात. मात्र परीक्षेचा वेळापत्रक 2-3 दिवस जरी पुढ गेलं तरी त्यांच्याकडे जेवायला पैसे नसतात. खूप हलाखीचं त्यांचं जगन असतं. याबद्दल तुम्ही एकदा सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना विचारण्याचा सल्ला दिला आहे. कारण तेसुद्धा यातूनचं पुढे गेले आहेत. ते तुम्हाला या आयुष्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकतील;. (हे वाचा: झोपेतही रडायची विद्या बालन; सततच्या रिजेक्शनमुळे होती डिप्रेशनमध्ये) तसेच प्रवीण यांनी अगदी खडसावून म्हटलं आहे, ‘या जगात काय फक्त राजकारण्यांनी जगायचं का, त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या नातेवाईकांनीच जगायचं का, तिकडे राजकारणी जगतो आणि इकडे सामान्य माणूस मरतो’, असं मत प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Marathi entertainment, Mpsc examination, Pune

    पुढील बातम्या