मुंबई 5 जुलै**:** बॉलिवूडची (Bollywood) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन (Vidya Balan) ओळखली जाते. सुपरस्टार हे बिरूद हिंदी चित्रपट सृष्टीत फार कमी अभिनेत्रींच्या वाट्याला येतं. अशा काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये विद्या बालनचा समावेश होतो. छोट्या पडद्यापासून कारकीर्द सुरू केलेल्या या अभिनेत्रीनं आपल्या केवळसौंदर्याच्या बळावर नव्हे तर उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत अढळ स्थान प्राप्त केलं आहे. आज प्रत्येक नवीन अभिनेत्री विद्या बालनसारखं यश मिळवण्याचं स्वप्न पाहते; पण हे यश मिळवण्यासाठी विद्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. अनेकवेळा नकार पचवावा लागला आहे, त्यावेळी कुठे तिला हे यश मिळालं आहे. ‘…म्हणून प्रियांकानं तुला तोंडावर पाडलं’; नेटकऱ्यानं केली सोना मोहपात्राची बोलती बंद विद्यानं आपल्या सहजसुंदर अभिनयानं लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. तिचं अभिनयातील प्रभुत्व सर्वांनी मान्य केलं आहे; पण एक काळ असा होता की कोणीही तिला त्यांच्या चित्रपटात घ्यायला तयार नव्हता. नुकत्याच एका मुलाखतीत विद्यानं तिच्या संघर्षाच्या काळातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. बालपणीच्या कटू आठवणीमुळे शरद केळकर भावुक; या कारणामुळे चिडवायचे लोक मीडिया रिपोर्टनुसार, विद्याची कारकीर्द सुरू झाली ती छोट्या पडद्यावरील मालिकांपासून. हम पांच या मालिकेत ती काम करत होती. टीव्ही (TV) जगतातून बाहेर पडून चित्रपटांच्या मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी ती प्रयत्न करत होती. संघर्षाचा हा काळ मोठा कठीण होता. काही दाक्षिणात्य चित्रपटांसाठी तिनं ऑडिशनही दिली, परंतु प्रत्येक वेळी तिला नकार मिळाला. या सततच्या नकारांनी ती खचून गेली होती. अनेकदा रात्री झोपताना ती रडायची, बर्याच वेळा रडत रडतच झोपी जायची. शेवटी आपलं चित्रपटात काम करण्याचं, मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही, असंच तिला वाटू लागलं होतं. अर्थात, अशा प्रतिकूल परिस्थितीत तिनं प्रयत्न करणं थांबवलं नव्हतं. अखेर तिचं नशिब फळलं, आणि 2005मध्ये तिला विधु विनोद चोप्राच्या (Vidhu Vinod Chopra) ‘परिणिता’ (Parineeta) चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचं खूप कौतुक झालं आणि विद्या बालन लोकांच्या नजरेत आली. विद्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला 15 वर्षे झाली आहेत. या काळात तिनं बरेच चढ-उतार पाहिले, परंतु चांगलं काम करण्याचा प्रयत्न तिनं कधीच थांबवलं नाही. म्हणूनच आज ती या स्थानावर पोहोचली आहे. चित्रपटसृष्टीत तिचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. निवडक पण आशयघन चित्रपट करून आपल्या अभिनयाच्या सामर्थ्यावर विद्या बालन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.