अभिनेता सुबोध भावे मराठीमधील एक उत्कृष्ट अभिनेता समजला जातो. नाटक, मलिका असो किंवा चित्रपट सुबोधने प्रत्येक माध्यामतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सुबोधने विविध धाटणीच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनामध्ये आपलं एक स्थान निर्माण केल आहे. तर दुसरीकडे पत्नी मंजिरी एक निर्माती आहे. मंजिरीने सुबोधच्या प्रत्येक यश-अपयशात त्याची साथ दिली आहे. तब्बल 30 वर्षांच्या या नात्यामध्ये मंजिरी त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे या दोघांची जोडी चाहत्यांना खुपचं भावते. या दोघांनाही चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत असतं. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. (हे वाचा:बालपणीच्या कटू आठवणीमुळे शरद केळकर भावुक; या कारणामुळे चिडवायचे लोक ) नुकताच मंजिरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला आणि सुबोधचा एक थ्रोबॅक फोटो शेयर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने सुबोधला हा फोटो आठवतो का? विचारत तो तब्बल 15 वर्षांपूर्वीचा फोटो असल्याचं सांगितल आहे. या फोटोमध्ये दोघेही खुपचं गोड दिसत आहेत. चाहत्यांनासुद्धा हा फोटो खूपच पसंत पडत आहे. (हे वाचा:हिना खाननं केली आमिरच्या घटस्फोटाची स्तुती; म्हणाली, ‘नाटक संपलं की...’) सुबोध आणि मंजिरीच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं, तर या दोघांचं प्रेम हे शालेय वेळेपासूनच आहे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण सुबोधने मंजिरीला चक्क इयत्ता आठवीमध्ये असताना प्रपोज केलं होतं. मात्र मंजिरीने त्याला लगेचचं होकार दिला नव्हता, तर चार दिवसानंतर मंजिरीने आपला होकार कळवला होता. आत्ता या दोघांच्याही लग्नाला जवळजवळ 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.