जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Pradeep Patwardhan passes away: 'पट्या मी तुला खूप मिस करणार यार'; प्रशांत दामले यांची भावुक पोस्ट

Pradeep Patwardhan passes away: 'पट्या मी तुला खूप मिस करणार यार'; प्रशांत दामले यांची भावुक पोस्ट

Pradeep Patwardhan passes away: 'पट्या मी तुला खूप मिस करणार यार'; प्रशांत दामले यांची भावुक पोस्ट

प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने अवघी चित्रपटसृष्टी हळहळली. त्यांना अनेक कलाकार आदरांजली वाहताना दिसत आहेत. पण सध्या प्रदीप यांच्या जुन्या मित्राने त्यांना उद्देशून एक खास पोस्ट लिहिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 09 ऑगस्ट: जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. एक हसरा नाचरा चेहरा आणि अप्रतिम अभिनेता मराठी चित्रपटसृष्टीने गमावला अशी प्रतिक्रिया अनेक ठिकाणाहून समोर येत आहे. प्रदीप यांना सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी श्रद्धांजली सुद्धा वाहिली आहे. अशातच प्रदीप यांच्या 44 वर्ष जुन्या मित्राने सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रदीप पटवर्धन यांच्या गाजलेल्या मोरूची मावशी नाटकात प्रशांत दामले सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. प्रदीप आणि प्रशांत यांची मैत्री तब्बल चौवेचाळीस वर्ष जुनी आहे. अगदी कॉलेजवयीन असल्यापासून मैत्री असलेल्या आपल्या लाडक्या मित्राला (prashant damale special facebook post for pradeep patwardhan) प्रशांत यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ते असं लिहितात, “पट्या… प्रदीप पटवर्धन… मी आणि प्रदीप.. आमची जोडी होती.. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगळवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या… सिद्धार्थ कॉलेज ची 5 वर्ष (1978 ते 1982) प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण 44 वर्षांची दोस्ती. ही घानिष्ठ मैत्री आता एक तर्फीच चालु राहणार. मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती. त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे. पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार 😓😓”

प्रदीप आणि प्रशांत यांची मोरूची मावशी नाटकातील जोडी सुपरहिट ठरली होती. या नाटकातला एक जुना व्हिडिओ सुद्धा सध्या बराच प्रसिद्ध होत आहे. या व्यतिरिक्त सुद्धा प्रदीप यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. महाराष्ट्राची लोकधारा, चल काहीतरीच काय, एक फुल चार हाफ, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, नवरा माझा नवसाचा अशा अनेक नाटक आणि सिनेमांत त्यांनी केलेल्या भूमिका अजरामर झाल्या आहेत. हे ही वाचा-  Pradeep Patwardhan Video: साठीतही होते एव्हरग्रीन! निधनानंतर प्रदीप पटवर्धनांचा दहीहंडीचा तो व्हिडीओ आला समोर प्रदीप यांचा जन्म गिरगावात झाला असून आज त्यांची राहत्या घरी प्राणज्योत मालवली. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या उत्साहाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नक्कीच सिनेसृष्टी खूप मिस करेल अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात