जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Pradeep Patwardhan Video: साठीतही होते एव्हरग्रीन! निधनानंतर प्रदीप पटवर्धनांचा दहीहंडीचा तो व्हिडीओ आला समोर

Pradeep Patwardhan Video: साठीतही होते एव्हरग्रीन! निधनानंतर प्रदीप पटवर्धनांचा दहीहंडीचा तो व्हिडीओ आला समोर

Pradeep Patwardhan Video: साठीतही होते एव्हरग्रीन! निधनानंतर प्रदीप पटवर्धनांचा दहीहंडीचा तो व्हिडीओ आला समोर

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 ऑगस्ट:  एकेकाळी रंगभूमी गाजवून प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज 9 ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.  त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली. मुंबईतील गिरगावात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे सहकलाकार राजकारण्यांपासून नवख्या कलाकारांपर्यंत सगळेच पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहत आहेत. मोरुची मावशी सारखं नाटक अजरामर करणारे प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर त्यांचा दहीहंडीचा एक व्हिडीओ समोर आला असून वयाच्या साठीतही चिरतरुण असलेल्या प्रदीप पटवर्धन यांचा उत्साह दिसून येतोय. अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचा संपूर्ण जन्म हा गिरगावात गेला. आयुष्याचा प्रवास ज्या गिरगावातून सुरू झाला त्याच गिरगावात त्यांचा शेवट झाला. गिरगावातील चाळीत आयुष्य घालवलेल्या प्रदीप यांच्यासाठी गिरगाव फार जवळचं आणि आपलं होतं. गिरगावात साजरा होणारा प्रत्येक सण उत्सावात त्यांचा सहभाग होता. गणेशोत्सव असो किंवा दहीहंडी गिरगावात प्रचंड उत्साह असतो. याच उत्साहात प्रदीप दरवर्षी सहभागी होत असतं. मागील वर्षी दहीहंडी साजरा करतानाचा पटवर्धन यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा - ‘मी त्यांना बघून घाबरून पळून आले’; प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर हेमांगीनं भावुक होत सांगितली ती आठवण

जाहिरात

व्हिडीओमध्ये प्रदीप पटवर्धन दहीहंडीच्या गाण्यावर चाळीत धुंद होऊन नाचताना दिसत आहेत. गिरगावच्या चाळीत साजरा होणारा दहीहंडी उत्सव प्रदीप यांच्यासाठी खास असायचा.  वयाच्या 65व्या वर्षीही प्रदीप यांच्यातील कलाकार तितकाच चिरतरुण होता हे व्हिडिओ पाहून लक्षात येतंय. व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. मोरुची मावशी या नाटकातून प्रदीप पटवर्धन यांचं नाव खऱ्या अर्थानं पुढं आलं.  मारुची मावशी व्यतिरिक्त प्रदीप पटवर्धन यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’, ‘चल काहीतरीच काय’ सारख्या प्रसिद्ध नाटकात कामं केली.त्याचप्रमाणे ‘एक फुल चार हाफ’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘गोळा बेरीज’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘पोलीस लाईन’ सारख्या सिनेमातही महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. अशा हरहुन्नरी नट काळाच्या पडद्याआड गेल्यानं मराठी सिने आणि नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात