...जेव्हा भुकेलेल्या दीपिकाला आमिरनं दिलं नव्हतं जेवण, अभिनेत्रीनं सांगितला किस्सा

...जेव्हा भुकेलेल्या दीपिकाला आमिरनं दिलं नव्हतं जेवण, अभिनेत्रीनं सांगितला किस्सा

दीपिका एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ज्यात मी भूकेलेली असताना आमिर खाननं जेवण न दिल्याचं तिनं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दीपिका तिचा पती रणवीर सिंहसोबत मुंबईतील तिच्या घरी अडकली आहे. अर्थात दीपिका हे लॉकडाऊन एन्जॉय करताना दिसत आहे. पण अशात दीपिका एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ज्यात मी भूकेलेली असताना आमिर खाननं जेवण न दिल्याचं तिनं म्हटलं आहे.

दीपिका पदुकोणनं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, '1 जानेवारी 2000 ची एक जुनी आठवण. मी 13 वर्षांची आणि थोडीशी विचित्र होते. आताही आहे. तो जेवत होता आणि मी भूकेली होते जशी मी नेहमीच असते. तो दही भात खात होता. पण त्यानं मला दिलं नाही आणि मी सुद्धा मागितलं नाही.' या पोस्टमध्ये दीपिकानं आमिर खानला टॅग केलं आहे. हा जुना फोटो आहे ज्यात आमिर खान दीपिकाच्या फॅमिलीसोबत दिसत आहे.

SHOCKING! 'बबीता जी'ला नेहमी मारहाण करायचा बॉयफ्रेंड, वाचा पुढे काय घडलं

दीपिकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटोवर कमेंट करताना रणवीर सिंहनं लिहिलं, 'ही तर खूप जुनी गोष्ट आहे.' याशिवाय तिच्या अनेक चाहत्यांच्या कमेंट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दीपिकानं या फोटोच्या माध्यमातून आमिरसोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला. याशिवाय तिनं बरेच थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फ्लॉप सिनेमामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री, खलनायकी भूमिकेनं चमकलं नशीब

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिचा शेवटचा सिनेमा छपाक जानेवारीमध्ये रिलीज झाला होता मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. याशिवाय ती लवकरच रणवीरसोबत '83' या सिनेमात रणवीरची ऑनस्क्रीन पत्नी अर्थात कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिच्या 'इंटर्न' या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे ज्याची निर्मिती सुद्धा ती स्वतःच करत आहे.

लॉकडाऊनमध्ये रविना टंडनचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर 'बिकिनी' PHOTO व्हायरल

First published: May 17, 2020, 1:01 PM IST

ताज्या बातम्या