मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मनोज वाजपेयी चारित्र्यहीन माणूस'; सुनील पालच्या टीकेवर अभिनेत्यानं दिलं सणसणीत उत्तर

'मनोज वाजपेयी चारित्र्यहीन माणूस'; सुनील पालच्या टीकेवर अभिनेत्यानं दिलं सणसणीत उत्तर

सुरुवातीला डॉक्टर्स वर केलेली टीका तर आता अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्यावरील टीका यामुळे कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) फारच चर्चेत आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई 30 जुलै: कॉमेडियन सुनील पाल (Comedian Sunil Pal) सध्या त्याच्या कॉमेडी पेक्षा त्याच्या वक्तव्यांमुळे फारच चर्चेत आहे. सुरुवातीला डॉक्टर्स वर केलेली टीका तर आता अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्यावरील टीका यामुळे सुनील पाल फारच चर्चेत आहे. अश्लील चित्रफीत राज कुंद्रा प्रकरणात (Raj Kundra Case) आपला मत मांडताना त्यांनी आपली गाडी मनोज यांच्या दिशेने वळवत त्यांच्यावर टीका केली.

सुनील पालने वाजपेयींना खालच्या पातळीचा माणूस तसेच बदमाश अशी टीका केली होती. त्यावर आता मनोज यांनी चांगला समाचार घेतला आहे. बाजपेयींनी  सल्ला देत सुनील पालची बोलती बंद केली आहे.

दरम्यान पॉर्नोग्रफी केस मध्ये सुनील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी डिजिटल स्पेस वर सेन्सॉरशिप नसल्याने याचा फायदा घेतला जात असल्याचं सांगितलं होतं. सुनील पाल म्हणाले ओटीटीवरील कंटेंट हा कुटुंबासाठी नाही. पुढे ते म्हणाले, "मनोज वाजपेयी कितीही मोठा अभिनेता असेल, कितीही पुरस्कार मिळाले असतील पण त्याच्या इतका बदमाश आणि खालच्या पातळीचा अभिनेता मी आजवर पहिला नाहीं."

हे वाचा-मीडियावर भडकली, शिल्पा शेट्टीची थेट हायकोर्टात धाव

सुनील पालच हे वक्तव्य ऐकून बाजपेयींना हसू आवरता येईना. त्यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं कि, "मी समजू शकतो लोकांकडे काम नाही. मी अशा स्थितीत राहिलो आहे. अशा परिस्थितीत लोकांनी मेडीटेशन करायला हवं."

हे वाचा-HBD: वडिलांसोबत लग्नात गायचा गाणी, सोनू निगम असा झाला प्रसिद्ध गायक

सुनील पालने मनोज वाजपेयी यांची द फॅमिली मनची (The Family Man) तुलना पॉर्नशी केली होती. त्यांनी म्हटलं मनोजला देशाने मोठा सन्मान दिला आहे. पण तो पॉर्नसारख्या कंटेंटमध्ये सामील आहे. सुनीलने द फॅमिली मन वर मोठी टीका केली होती आणि हे देखील एक पॉर्न आहे. ते बंद व्हायला हवं असं म्हटलं होतं.

First published:

Tags: Bollywood, Manoj Bajpayee