• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: वडिलांसोबत लग्नात गायचा गाणी, Sonu Nigam असा झाला प्रसिद्ध गायक

HBD: वडिलांसोबत लग्नात गायचा गाणी, Sonu Nigam असा झाला प्रसिद्ध गायक

सोनूने 1995 साली प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘सा रे ग म प’ होस्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने बेवफा सनमच गाणं ‘अच्छा सिला दिया’ हे गायलं जे प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

 • Share this:
  मुंबई 30 जुलै: बॉलिवूडचा मेलोडी गायक (Bollywood Singer) म्हणून ओळखला जाणाऱ्या सोनू निगमचा (Sonu Nigam) आज वाढदिवस (Birthday). फरिदाबादला सोनुचा जन्म झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षीच त्याने गायन सुरू केलं होतं. सोनुच्या आवाजाचं कसाब लोकांनी लहानपणीच पाहिलं होतं. सोनूचे वडील देखील गायक होते. त्यांच्यासोबत तो लग्नांमध्ये गाणी गायचा. क्या हुआ तेरा वादा हे गाणं एकदा त्याने गायलं होतं. सोनूचा आवाज ऐकून अनेकांना मोहम्मद रफी यांची आठवण व्हायची. वयाच्या 19 व्या वर्षी सोनू गायनाला आपलं करिअर बनवण्यासाठी मुंबईला आला होता.
  सोनूने हिन्दुस्तानी क्लासिकल गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून गाण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. सोनुच नाव त्या बॉलिवूड गायकांमध्ये येत ज्यांनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, तेलुगू , तमिळ, बंगाली यासहित 12 भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
  सोनूने 1995 साली प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘सा रे ग म प’ होस्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने बेवफा सनमच गाणं ‘अच्छा सिला दिया’ हे गायलं जे प्रचंड लोकप्रिय झालं होतं. त्याने बॉर्डर चित्रपटात अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं संदेसे आते है हे गाणं गायलं. ते देखील फारच लोकप्रिय झालं होतं. अशा अनेक चित्रपटांसाठी त्याने गाणी गायली आणि अनेक पुरस्कार मिळवले.
  सोनूच अभी मुझमे कही हे अग्निपथ मधील गाणं फारच हीट ठरलं होतं. त्यामुळे त्याला फारच प्रसिध्दी मिळाली होती. त्यानंतर सोनूची गणना बॉलिवूडच्या महागड्या गायकांमध्ये होऊ लागली. 2002 साली सोनूने मधुरीमा हिच्याशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा देखील आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: