मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मीडियावर भडकली, शिल्पा शेट्टीची थेट हायकोर्टात धाव

मीडियावर भडकली, शिल्पा शेट्टीची थेट हायकोर्टात धाव

शिल्पाच्या पतीवर अश्लील चित्रफित तयार करण्याचा आणि त्या इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप लागला आहे.

शिल्पाच्या पतीवर अश्लील चित्रफित तयार करण्याचा आणि त्या इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप लागला आहे.

शिल्पाच्या पतीवर अश्लील चित्रफित तयार करण्याचा आणि त्या इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप लागला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 30 जुलै-  राज कुंद्रा प्रकरणामध्ये(Raj Kundra Case) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पतीच्या अटकेमुळे सध्या शिल्पा शेट्टीसुद्धा (Shilpa Shetty) खुपचं चर्चेत आहे. तिच्याबद्दल अनेक बातम्या आपल्याला प्रत्येक माध्यमावर पाहायला मिळत आहेत. मात्र शिल्पाने एका माध्यमावर खोटी रिपोर्टिंग करण्याचा आणि आपली प्रतिमा खराब करण्याचा आरोप करत बॉम्बे हायकोर्टात मानहानीचा केस (Defamation Case) ठोकला आहे. याची सुनावणी उद्या होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला पोर्नोग्राफी केसमध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे हे प्रकरण खुपचं गंभीर बनत चाललं आहे. पती राज कुंद्राला अटक होताचं, अभिनेत्री शिल्पा शेट्टीसुद्धा चर्चेत आली आहे. शिल्पाबद्दल अनेक बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.

शिल्पाच्या पतीवर अश्लील चित्रफित तयार करण्याचा आणि त्या इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप लागला आहे. आपल्या देशामध्ये पोर्नोग्राफीबद्दल खुपचं कडक शासन आहे. आणि त्यामुळेचं राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुपचं मजबूत पुरावे असल्याचंसुद्धा म्हटलं आहे. तसेच अनेक अभिनेत्री आणि मॉडेलनी राज कुंद्रावर धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळेचं या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे. राज कुंद्रा प्रकरणामध्ये आत्तापर्यंत अनेक कनेक्शन समोर आले आहेत. त्या दिशेने पोलीस कसून चौकशी करत आहेत.

(हे वाचा:Bigg Boss OTT: बिग बॉसच्या घराची पहिली झलक आली समोर; पाहा VIRAL फोटो )

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीसुद्धा या संदर्भात चौकशी केली जात आहे. तिचा या प्रकरणात काही हात आहे का हे पाहिलं जात आहे. त्यामुळे ती सतत चर्चेत आहे. नुकताच ANI ने दिलेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीला अजून या प्रकरणात क्लीन चीट मिळालेली नाहीय. सध्या शिल्पा शेट्टीच्यासुद्धा बँक खात्याचे संदर्भ तपासले जात आहेत.

First published:

Tags: Raj kundra, Shilpa shetty