मुंबई, 26 मार्च : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक अशा महत्वाच्या बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. राज्यातील परीस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी ती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सर्वोतोपरी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजवणी करण्यात येत आहे. त्यासंदर्भात राज्यातील प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठका घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे कोणासोबत घेऊ शकतात बैठका?
1. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद, मुख्याकार्यकारी अधिकारी यांच्यासोबत व्हिडीयो काँनफरसिंगद्वारे चर्चा करण्याची शक्यता.
2. राज्यातील मुख्य आपतकालिन विभागाचा कंट्रोल रूम मंत्रालयात आहे. याच कंट्रोल रूमच्या सचिवांशी बैठक घेण्याची शक्यता.
3. मुंबई आणि एमएमआर परीसरातील नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, मीरा-भाईंदर या महापालिकांच्या आयुक्तांशी आणि इतर यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्याची शक्याता आहे.
4. जीवनाश्यक वस्तू आणि पदार्थांचा तुटवडा भासू नये तसेच त्यांचं वितरण देखील सुरक्षित होईल या दृष्टीने केल्या जात असलेल्या उपाय योजनांचा आढावा संबधीत प्रमुख अधिकार्याची बैठक घेऊन आढावा घेणार.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच होणार?
राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी, दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरू आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर काही कार्यवाही होते का, हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.