"मीसुद्धा खूप काही बोलू शकतो पण...; अनुषा दांडेकरच्या आरोपांनंतर करण कुंद्रानेही अखेर मौन सोडलं

अनुषा दांडेकरने (Anusha Dandekar) आरोप केल्यानंतर अखेर करण कुंद्राही (Karan Kundra) आपल्या ब्रेकअपबाबत व्यक्त झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) आणि मॉडेल अनुषा दांडेकर (Anusha Dandekar)  यांचं ब्रेकअप प्रकरण अजूनही शांत झालेलं दिसत नाही. अनुषाने ब्रेकअपनंतर करणवर काही आरोप केले होते. पण करणने मात्र त्यावर काहीच उत्तर दिलं नव्हतं. अखेर एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्याने या विषयावर भाष्य केलं आहे.

करण आणि अनुषा जवळपास तीन ते चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही एम टीव्ही (MTV) वरील ‘लव्ह स्कूल’ (love school)  या शो ला होस्ट केल होतं. त्यात ते कपल्सना रिलेशन टिप्स द्यायचे तसंच त्यांचे प्रश्नही सोडवायचे. पण आता खऱ्या आयुष्यात दोघांचही ब्रेकअप झालं आहे. अनुषा-करणचं ब्रेकअप होऊन जवळपास एक वर्ष उलटलं. अनुषाने ब्रेकअपचं कारण सांगत तिने करणवर काही आरोप केले होते. अनुषाच्या आरोपांनंतर अखेर करणणंही आपलं ब्रेकअपबाबतचं मौन सोडलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना करण म्हणाला, “मी नात्याचा आदर करून शांत राहिलो आहे आणि तसंच राहायला आवडेल. या परिस्थितीत मी सुद्धा दोन्ही कुटुंबांचा विचार करत आहे. मी सुद्धा खूप काही गोष्टी सांगू शकतो पण तो मी नाही. अनुषाने जे काही सांगितलं तो तिचा दृष्टीकोन होता"

हे वाचा - ये फिटनेस की बात है.... अभिनेत्रीनं समुद्रकिनारी केला हॉट योगा

"कधी कधी मला फार हसू येत या सगळ्या गोष्टी ऐकून. मला कळत नाही एखाद्या व्यक्तीचा इतका तिरस्कार करण्यासाठी काय गोष्टी उपयुक्त ठरतात. आम्ही एका सुंदर नात्यात होतो. मी अनुषाकडून खूप काही गोष्टी शिकलो आणि माझ्या मनात तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी खूप आदर आहे. पण आताच माझ्यावर हे सगळे आरोप का लावले जात आहेत, जेव्हा मी माझ्या कामात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या कोणीही असे आरोप केले नाहीत", असं करण म्हणाला.

हे वाचा - मुलीनेही दिला होकार; तुम्हाला काय वाटतं आता तरी पोपटलालचं लग्न होणार?

त्यामुळे आता करणच्या उत्तरावर अनुषा आणखी काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. करणची नुकतीच एका हिंदी मालिकेत एन्ट्री झाली आहे. ये रिश्ता क्या केहलाता है या मालिकेत तो काम करत आहे. याशिवाय अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये करणने काम केलं आहे.

Published by: News Digital
First published: April 17, 2021, 9:46 PM IST

ताज्या बातम्या