मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! हृतिकच्या नव्या Beach Facing घराची किंमत आहे 97.50 कोटी, 10 पार्किंग स्लॉट आणि बरंच काही...

OMG! हृतिकच्या नव्या Beach Facing घराची किंमत आहे 97.50 कोटी, 10 पार्किंग स्लॉट आणि बरंच काही...

अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) खरेदी केलेल्या या घराची किंमत वाचून तुम्ही नक्कीच थक्क झाले असाल. हृतिकने मुंबईतील जुहू वर्सोवा लिंक रोडवर असणाऱ्या एका इमारतीमध्ये 2 अपार्टमेंट खरेदी केले आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
पीमुंबई, 25 ऑक्टोबर : तुमच्या आवडत्या कलाकारांनी देशातील कोणत्याही शहरात खासकरून मुंबईत घर घेणं तशी फारशी नवीन बाब नाही आहे. त्यासाठी ते तगडी किंमत देखील मोजतात. पण अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) खरेदी केलेल्या या घराची किंमत वाचून तुम्ही नक्कीच थक्क झाले असाल. हृतिकने मुंबईतील जुहू वर्सोवा लिंक रोडवर असणाऱ्या एका इमारतीमध्ये 2 अपार्टमेंट खरेदी केले आहे. सी फेसिंग असणाऱ्या या अपार्टमेंट्सची किंमत 97.50 कोटी रुपये आहे. मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार 3 मजल्यांचं हे घर एकत्रित करण्याचा त्याचा विचार आहे. यापैकी एक घर पेंटहाऊस आहे. हृतिकच्या या अपार्टमेंट्समध्ये अनेक एक्सक्लूझिव्ह सुविधा असणार आहेत. खूपच लॅव्हिश पद्धतीने यांचे बांधकाम केले आहे. हृतिकने हे घर बिल्डर समीर भोजवानीकडून खरेदी केले असून, यामध्ये 6500 स्क्वेअर फीटचा ओपन टू स्काय टेरेस, एक्सक्लूझिव्ह लिफ्ट आणि बिल्डिंगमध्ये 10 पार्किंग स्लॉट देण्यात आले आहेत. या बिल्डिंगचं नाव 'मन्नत' आहे. मीडिया अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार गुरुवारी या घराचा करार पूर्ण झाला आहे. (हे वाचा-युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या बायकोचा हॉट अंदाज, Beach Vibes देणारा VIDEO व्हायरल) मीडिया अहवालातील माहितीनुसार, हृतिकने या घरांसाठी 1.95 कोटीं रुपये स्टँप ड्यूटी भरली आहे आणि दोन वेगवेगळे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत. हृतिकने 27,534.85 स्क्वेअर फीटच्या दुमजली अपार्टमेंटसाठी 67.50 कोटी रुपये  रक्कम मोजली आहे. हे अपार्टमेंट पंधराव्या आणि सोळाव्या मजल्यावर आहे. तर चौदाव्या मजल्यावरील 11,165 स्क्वेअर फीटसाठी 30 कोटी रुपये मोजले आहेत. हा करार महिनाभरापूर्वी निश्चित झाला होता, तर गुरुवारी तो पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या ही इमारत निर्माणाधीन असून याठिकाणी अद्याप कोणतीही सुविधा उपलब्ध झाली नाही आहे. हृतिकने जून महिन्यात जुहूमध्ये एक अपार्टमेंट भाडेतत्त्वावर घेतले आहे. जुहू प्राइम बीच इमारतीत असणाऱ्या या अपार्टमेंटचं भाडं 8.25 लाख रुपये प्रति महिना आहे. (हे वाचा-ड्रग्ज घेताना प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला पकडले रंगेहात! NCB ची धडक कारवाई) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास हृतिक 'सुपर हिरो' लुकमध्ये पुन्हा एकदा दिसण्याची शक्यता आहे. 'क्रिश' फ्रँचायझीमधील नवीन सिनेमा येत असल्याची माहिती हृतिकचे वडील अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिली होती. तर हृतिकने देखील गोंधळात टाकणारी एक पोस्ट करत 'जादू' परतणार असल्याची हिंट दिली होती.
First published:

Tags: Bollywood, Hritik Roshan

पुढील बातम्या