आशिष सिंह, मुंबई, 25 ऑक्टोबर : मनोरंजन विश्वामध्ये पसरलेलं ड्रग्जचं जाळं गेल्या काही दिवसांपासून उघड होत आहे. ड्रग केसमध्ये (Drug Case) बॉलिवूडसह सँडलवूडमधून (Bollywood and Sandalwood) देखील मोठमोठे मासे पोलिसांच्या गळाला लागले आहेत. दरम्यान एनसीबीने (NCB) आता याप्रकरणी आणखी एक कारवाई केली आहे. केवळ बॉलिवूडच नाही ड्रग्जची पोहोच टेलिव्हिजन विश्वामध्ये देखील आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका टीव्ही अभिनेत्रीला रंगेहात पकडले आहे. ही अभिनेत्री ड्रग्ज घेत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीच्या मुंबई झोनल टीमने कारवाई केली आहे. याप्रकरणी एनसीबीकडून बराच माल ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच एनसीबीने धडक कारवाई करत एका पेडलरला देखील अटक केली आहे. एनसीबीने या कारवाईमध्ये जप्त केलेला माल एनसीबीच्या कार्यालयामध्ये आणला जाणार आहे. नार्कोटिक्स कंंट्रोल ब्युरोच्या सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीच्या आणि पकडण्यात आलेल्या पेडलरच्या घर तसंच त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. याठिकाणांवरून कोकेन, एल.एस.डी, एम.डी.एम.ए. आणि गांजा जप्त करण्यात आले आहे. (हे वाचा- ओळखताही येणार नाही अशी झाली बादशाहच्या चेहऱ्याची अवस्था, हा PHOTO होतोय व्हायरल) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या ड्रग कनेक्शनचा एनसीबीकडून तपास सुरू आहे. हा तपास सुरू असतानाच एनसीबीसमोर हे नवे प्रकरण समोर आले आहे. SSR मृत्यू प्रकरणातील ड्रग कनेक्शनमध्ये अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली होती. अभिनेत्री दीपिका पादूकोण, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, सारा अली खान या अभिनेत्रींची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सँडलवूडमध्ये देखील काही दिग्गज कलाकारांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.