Home /News /entertainment /

अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं 2 वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न, पत्नी मेघना राज आहे प्रेग्नन्ट

अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं 2 वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न, पत्नी मेघना राज आहे प्रेग्नन्ट

चिरंजीवी सरजा यांचं 2018 मध्ये मेघना राजशी लग्न झालं होतं. दोघंही हिंदू आण ख्रिश्चन रिती-रिवाजाप्रमाणे लग्नाच्या बेडीत अडकले होते.

  मुंबई, 8 जून : प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं 7 जूनला हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन झालं. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. चिरंजीवी सरजा यांचं 2018 मध्ये मेघना राजशी लग्न झालं होतं. दोघंही हिंदू आण ख्रिश्चन रिती-रिवाजाप्रमाणे लग्नाच्या बेडीत अडकले होते. चिरंजीवी यांच्या अशा अचानक जाण्यानं त्यांच्या पत्नीला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. याशिवाय अशी माहिती समोर आली आहे की मेघना गरोदर आहे. बॉलिवूड हंगामानं दिलेल्या वृत्तानुसार चिरंजीवी सरजा यांची पत्नी मेघना प्रेग्नन्ट असून हे दोघंही आपल्या पहिल्या बाळाची आतुरतेनं वाट पाहत होते. मात्र मेघना किंवा चिरंजीवी यापैकी कोणही याबाबत ऑफिशिअल घोषणा केलेली नाही. लग्नाआधी 10 वर्ष मेघना आणि चिरंजीवी एकमेकांचे चांगले मित्र होते. नंतर हीच मैत्री पुढे लग्नाच्या नात्यात बदलली. मेघना या सुद्धा अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. सोनू सूदकडे मदत मागणारे ट्वीट अचानक केले जातायत डिलिट, काय आहे या मागचं कारण
  सरजा यांनी कन्नड भाषेतील सिनेमा वायुपुत्र (2009) यातून करिअरची सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांनी काका सरजा यांच्यासह सहदिग्दर्शक म्हणून 4 वर्षे काम केले आहे. अवघ्या 39 वयात त्यांनी अचानक घेतलेल्या एग्झिटमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले होते. त्याच्या अभिनयाचे लोक चाहते आहेत. चिरंजीवीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 22 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात सिंगगा, अम्मा आय लव यू, चिररू, समहारा, राम-लीला, रुद्र तांडव यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. शिल्पासाठी अक्षय कुमारनं रवीनाला सोडलं, पण असं काय झालं की त्यांचं लग्न मोडलं लॉकडाऊनने घेतला अभिनेता-अभिनेत्रीचा जीव, शूटिंग बंद झाल्याने केली आत्महत्या
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या