

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज 45 वा वाढदिवस. आता शिल्पा तिचा नवरा राज कुंद्रासोबत तिच्या वैवाहिक आयुष्यात खुश आहे मात्र तिच्या आयुष्यात एक काळ असा होता जिथे तिचं नावं अक्षय कुमारसोबत जोडलं गेलं होतं. दोघं लग्न करणार असं बोललं जात होतं आणि अचानक त्यांचं नातं तुटलं.


अक्षय कुमार असा अभिनेता आहे. ज्याचं नाव ट्विंकल खन्नाच्या अगोदर अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. पण त्यातही शिल्पा शेट्टीशी त्याच्या अफेअरची चर्चा खूप झाली होती. मात्र या प्रेमाचा शेवट खूप वाईट झाला होता.


अक्षयची इमेज त्यावेळी सिनेमांसोबतच रिअल लाइफमध्येही लव्हर बॉय अशी बनली होती. शिल्पाच्या आधी अक्षयचं रवीन टंडनसोबत अफेअर होतं. पण शिल्पा त्याच्या लाइफमध्ये आली आणि रवीना आणि अक्षयच्या लव्हस्टोरीचा द एंड झाला.


असं म्हटलं जातं की अक्षय आणि रवीना लग्न करणारच होते पण त्याआधीच अक्षयच्या लाइफमध्ये शिल्पाची एंट्री झाली आणि या दोघांच्या नात्यात कायमचा दुरावा आला. एवढंच नाही तर या ब्रेकअप नंतर रवीनानं आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.


शिल्पा आणि अक्षयची पहिली भेट 1994 मध्ये ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’च्या सेटवर झाली. 1997 मध्ये ‘जानवर’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली.


धडकन सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी हे दोघं लवकरच लग्न करणार असं बोललं जाऊ लागलं. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट केले जात होते. सर्वकाही ठीक चाललंच होतं अशाच अचानक या लव्हस्टोरीतही नवा ट्वीस्ट आला.


धडकन सिनेमाच्या वेळीट अक्षय शिल्पाला सोडून त्याची खास मैत्रिण ट्विंकल खन्नाच्या प्रेमात पडला. जेव्हा शिल्पाला हे समजलं तेव्हा तिनं खूप गोंधळ घातला.


त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार अक्षयनं शिल्पासमोर लग्नासाठी एक अशी अट ठेवली होती. जी शिल्पा मान्य करणं कधीच शक्य नव्हतं. अक्षय शिल्पाला फिल्मी करिअर सोडण्याची अट घातली आणि जी शिल्पाला मंजूर नव्हती.


2000 मध्ये शिल्पा आणि अक्षयचं ब्रेकअप झालं आणि अक्षयनं ट्विंकलशी लग्न केलं. ब्रेकअप नंतर शिल्पानं प्रसार माध्यमात अक्षयनं आपला फायदा घेतला आणि दुसरी मुलगी मिळाल्यावर मला सोडून दिलं असंही सांगितलं होतं.