Home /News /entertainment /

सोनू सूदकडे मदत मागणारे ट्वीट अचानक केले जातायत डिलिट, काय आहे या मागचं कारण

सोनू सूदकडे मदत मागणारे ट्वीट अचानक केले जातायत डिलिट, काय आहे या मागचं कारण

सोनू सूदनं ज्या लोकांना रिप्लाय केला आहे अशी अनेक ट्वीट ट्विटरवरून डिलिट झालेली आहेत.

    मुंबई, 8 जून : अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनमध्ये काम मिळत नसल्यानं त्रासलेल्या मजूरांना घरी सोडण्याचं काम करत आहे. नुकतीच त्यानं याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या आधी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रीवेंद्र रावत. केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनूच्या कामाचं कौतुक केलं आहे. पण दुसरीकडे त्याच्या कामात बाधा आणण्याचं कामही काही लोक करताना दिसत आहेत आणि याची सुरुवात सुद्धा ट्विटरपासूनच झाली आहे. सर्वांनाच माहित आहे की सोनू सूदच्या कामाची सुरुवातच ट्विटरवरुन झाली होती. सुरुवातीच्या काळात ट्विटरवरुन मदतीची मागणी झाल्यावर सोनू सूदनं त्यांना दिलेल्या उत्तरांनी सर्वांची मनं जिंकली होती. पण आता एक माजी पत्रकार दिलीप मंडल यांनी दावा केला आहे की, सोनू सूदनं ज्या लोकांना रिप्लाय केला आहे अशी अनेक ट्वीट ट्विटरवरून डिलिट झालेली आहेत. यावरून हे फक्त ट्विटर आयडी होते का? किंवा त्याच्या मागे खरंच कोणी व्यक्ती होते की नाही असं संभ्रम निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अभिनेता-अभिनेत्रीने राहत्या घरात केली आत्महत्या; सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह सोनू सूदकडे मदत मागणाऱ्यांपैकी अनेक ट्वीट असे सुद्धा होते ज्यांनी त्याच्यकडे मदत मागितली होती आणि फोटो सुद्धा शेअर केले होते. त्यांना सोनूनं मदत केली ट्विटरवर त्यांचं बोलणं झालं मात्र यानंतर अचानक हे ट्वीट डिलिट केले गेले आहेत. हे असं का झालं याविषय आहे सवाल उठले आहेत. याशिवाय आता सोनू सूदनंही या विषयी चिंता व्यक्त केली आहे की, त्याच्याही नजरेत असे काही ट्वीट आले आहेत. जे केवळ ट्वीट करण्याच्या उद्देशानं केलं गेले होते. ज्यामुळे ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचणं कठीण झालं आहे. याबाबत सोनू सूदनं एक ट्वीट केलं आहे. त्यानं लिहिलं, कृपया ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांनीच ट्वीट करा मी पाहिलं आहे की अनेक लोक ट्वीट करून मग ते डिलिट करत आहे. ज्यामुळे आमच्या कामाबद्दल संभ्रम निर्माण होतं आहे. याशिवाय यामुळे अनेक गरजवंतापर्यंत पोहोचताना त्रास होत आहे. विश्वासाच्या या नात्यात बाधा आणण्याचं काम कृपया कोणी करू नये. जेव्हा सोनूचे ट्वीट अचानक डिलिट होत असल्याचं समोर आलं त्यानंतर सोनूनं त्याच्या ऑफिशिअल अकाउंटवर हे ट्वीट केलं आहे. Covid -19 ची लागण झालेल्या अभिनेत्रीने रुग्णालयातून प्रसिद्ध केला VIDEO धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Coronavirus, Sonu Sood

    पुढील बातम्या