नवी दिल्ली, 7 जून : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. चित्रपटसृष्टीलाही याचा मोठा परिणाम सहन करावा लागत आहे. शूटिंग बंद झाल्याने चित्रपटांसह मालिकांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
तामिळ मालिकेत काम करणारे अभिनेता श्रीधर आणि त्यांची बहीण जया कल्याणी (अभिनेत्री) यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे दोघेही तामिळ भाषेतील मालिकांमध्ये काम करीत होते. त्या दोघांचेही लग्न झाले नव्हते. साधारण 45 ते 50 वयवर्ष असलेल्या या दोघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
त्यांचा मृतदेह चेन्नई येथील त्यांच्या राहत्या घरी सापडला. शेजारच्यांना त्यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस दार तोडून घरात शिरले. त्यांचे मृतेदह सडलेल्या अवस्थेत दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळले. गेल्या 7 वर्षांपासून ते त्या घरात राहत होते. शिवाय पोलिसांना त्यांच्या घरातून Actors Association चे ओळखपत्रही सापडले. पोलिसांनी तातडीने दोघांचा मृतदेह स्टेनली रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. लॉकडाऊनमध्ये काम आणि परिणामी पैसे नसल्याने या दोघा भाऊ-बहिणींनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हे वाचा-आता हद्द झाली! हत्तीणीनंतर कुत्र्यावर पाशवी अत्याचार; औरंगाबादमधील भयंकर VIDEO
पुण्यातील महिलेचा प्रताप! प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी सासरीच घातली धाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sucide, TV serials