Home /News /entertainment /

शिवाजी महाराजांवर येतेय नवी मालिका; हा अभिनेता साकारणार छत्रपतींची भूमिका

शिवाजी महाराजांवर येतेय नवी मालिका; हा अभिनेता साकारणार छत्रपतींची भूमिका

अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

  मुंबई, 5 एप्रिल : अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) अनेक वर्षांनंतर टेलिव्हिजन (television) वर कमबॅक करत आहे. तर या वेळी तो छत्रपती शिवाजी महारांच्या (Chattrapati Shivaji Maharaj)  भूमिकेत दिसून येणार आहे. नुकतीच भूषणने याबाबतची माहिती सोशल मिडीया वर दिली. स्टार प्रवाह (star pravah) वाहिनी वर लवकरच नवी मालिका सुरू होत आहे. 'जय भवानी जय शिवाजी' (Jay Bhavani Jay Shivaji)  असं या मालिकेचे नाव आहे. मालिकेत भूषण महाराजांची भूमिका साकारणार आहे. नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला, या सोहळ्यात भूषणने शिवाजी महारांजावरील एक परफॉर्मन्स सादर केला होता आणि त्यानंतर त्याने या नव्या मालिकेविषयी तसेच भूमिकेविषयी सांगितले. अवश्य पाहा - ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या एजाज खानला झाली कोरोनाची लागण टाईम्स ऑफ इंडिया (TOI) ने दिलेल्या वृत्तानुसार भूषण स्क्रिन वर मराठा योद्धा प्ले करण्यासाठी फारच उत्सुक आहे.  "ही एक उत्तम संधी होती त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही". भूषण म्हणाला. पुढे भूषणने सांगितले की  "हा संपूर्ण प्रवास फार मोहक होता. मला तास् न् तास मेकअप आणि कॉस्ट्यूम साठी बसावे लागते, आणि त्यानंतर इतिहासातील महान योद्ध्याच्या रूपात मी परावर्तीत होतो. विशेष म्हणजे आम्ही तयारी फार आधीपासून सुरू केली होती. आम्ही फक्त शेवटी स्क्रिप्ट वाचलं नाही. सगळी तयारी सुरूवातीपासूनच केली होती. सगळं काही फारच भव्य दिव्य आहे. शुटिंग चा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप सुंदर आहे".

  ऐश्वर्यानं अभिषेकसोबत लग्न का केलं? हे आहे लग्नामागचं खरं कारण...

  भूषण याआधी टेलिव्हिजनवर अनेक मालिकांमध्ये दिसला होता. पिंजरा (pinjara) या झी मराठी (zee marathi) वरील मालिकेनंतर टेलिव्हिजन पासून त्याने ब्रेक घेतला होता. तर अनेक मराठी चित्रपटांमध्येही तो दिसला होता. टाईमपास (timepass), टाईमपास 2, मिसमॅच, सतरंगी रे, आम्ही दोघी, शिमगा अशा  अनेक चित्रपटांत त्याने काम केलं आहे. याशिवाय zee5 वरील वेबसिरीज 'गोंद्या आला रे' (Gondya ala re) मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Chhatrapati shivaji maharaj, Entertainment, Marathi entertainment, Shivaji maharaj

  पुढील बातम्या