मुंबई, 5 एप्रिल : बॉलिवूडचं फेमस कपल अभिषेक (Abhishek Bacchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bacchan) यांच्या नात्याविषयी अनेकांना त्यांच्या लग्नाच्या अनेक वर्षानंतरही प्रश्न पडतात. यातीलच अभिषेकला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे “ऐश्वर्याने तुझ्याशी का लग्न केलं?” खुद्द अभिषेकनेच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं लग्न त्यावेळी खूप गाजलं होतं. सलमानशी ब्रेकअप झाल्याच्या बऱ्याच काळानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या चे सुत जुळले.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांच अरेंज मॅरेज (arrange marriage) असल्याचा गैरसमज अनेकांना आहे पण असं काहीही नाही. अभिनेता अभिषेक बच्चनने जानेवारी 2007 रोजी न्यूयॉर्कमधील एका हॉटेलच्या बाल्कनीमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. उमराव जान या चित्रपटादरम्यान दोघांचीही ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. व अभिषेक ने ऐश्वर्याला प्रपोज केलं. नंतर दोघांनीही लग्नगाठ बांधली. पण ऐश्वर्याने केवळ अभिषेक हा सुपरस्टार अमिताब बच्चन (Amitabh Bacchan) यांचा मुलगा आहे म्हणून ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न केलं अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी अभिषेक आणि एश्वर्याच्या लग्नाची फार चर्चा झाली होती.
View this post on Instagram
पण अभिषेक ने या प्रश्नांचा खुलासा करत 2014 मध्ये 'कॉफी विथ करण' (coffee with karan) या शोमध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या. "ऐश्वर्यानं मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे किंवा मी स्टार आहे म्हणून लग्न केलेलं नाही. तसंच मी सुद्धा ती जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे किंवा खूप मोठी स्टार आहे म्हणून तिच्याशी लग्न केलेलं नाही. वास्तवात असं काहीच नाही. आम्ही व्यक्ती म्हणून एकमेकांच्या प्रेमात पडलो." अभिषेक म्हणाला.
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत अभिनेते, निर्मात्यांशी साधला संवाद; नेमकं काय घडलं या बैठकीत?
"ऐश्वर्यानं मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे किंवा मी स्टार आहे म्हणून लग्न केलेलं नाही. तसंच मी सुद्धा ती जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे किंवा खूप मोठी स्टार आहे म्हणून तिच्याशी लग्न केलेलं नाही. वास्तवात असं काहीच नाही. आम्ही व्यक्ती म्हणून एकमेकांच्या प्रेमात पडलो." असही अभिषेक ने स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment