Home /News /entertainment /

ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या एजाज खानला झाली कोरोनाची लागण

ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या एजाज खानला झाली कोरोनाची लागण

अभिनेता एजाज खान (Ajaz khan) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. एजाजमुळं आता NCB अधिकाऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

    मुंबई 5 एप्रिल: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान ड्रग्ज प्रकरणामुळं NCBच्या ताब्यात असलेल्या अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. एजाजमुळं आता NCB अधिकाऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) याला ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपाखाली NCBनं ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी शादाब बटाटा नामक एका ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यानं एजाजचं नाव घेतलं. त्यामुळं विमानतळावरुनच एजाजला पकडण्यात आलं. ताब्यात घेतल्यानंतर चौकशि करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी एजाजच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचारी आणि NCB अधिकाऱ्यांना क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आलं आहे. एजाजवर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं उपचार सुरु आहेत. अवश्य पाहा - पहिल्या शोसाठी किती रुपये मिळाले? दया बेननं सांगितला पहिल्या पगाराचा किस्सा मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्स माफियाशी एजाज खानचे संबंध असल्याची माहितीही एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. त्याचे मुंबईतील बटाटा गॅंगशी असलेले संबंध समोर आले आहेत. एजाजला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीच्या पथकाने मुंबईतील अंधेरी आणि लोखंडवाला परिसरातही छापे टाकले आहेत. एजाजला अटक करण्यापूर्वी, एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स पुरवठादार असणाऱ्या फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला शनिवारी अटक केली होती. शादाबच्या चौकशीनंतरच एजाजला ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे बॉलिवूड अभिनेता एजाज खानच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Coronavirus symptoms, Covid-19 positive, Crime, Drug case, Drugs, NCB

    पुढील बातम्या