मुंबई 13 ऑगस्ट: बिग बॉस मराठी सिझन 3 मध्ये दिसून आलेला अभिनेता आविष्कार दारव्हेकर पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात धडाक्यात एंट्री झालेल्या आविष्कारसमोर त्याची एक्स वाइफ म्हणजे स्नेहा वाघसुद्धा खेळणार होती. सध्या (aavishkar darwhekar wife) आविष्कार त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आला असून त्याने पुन्हा एकदा लग्न केल्याचं समोर आलं आहे. आविष्कारने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या पत्नीचा फोटो बघायला मिळत आहे. आविष्कारने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने त्याने काही स्पेशल फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये एक महिला दिसत असून तिचा एकूण अवतार आणि भांगेत असलेलं सिंदूर बघून आविष्कारची ही दुसरी बायको असल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या या स्पेशल फोटो आणि व्हिडिओमधून त्याने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचं कळून येत आहे. त्याची पत्नी नेमकी कोण आहे याबद्दल अजून कोणताही अपडेट समोर आलेला नाही. तसंच आविष्कारने सुद्धा याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. हे ही वाचा - वर्गात विद्यार्थी नवे पण मास्तर तेच! Bigg Boss Marathi 4 साठी महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन; प्रोमो आऊट शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देत तो लिहितो, “तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी खूप आभार. सर्वाना खूप प्रेम. तुमच्या शुभेच्छा मला पुढचं पाउल टाकत राहायला बळ देत असतात.” त्याच्या या फोटोवर अनेक कमेंटमध्ये त्याला दुसऱ्या बायकोबद्दल विचारणा होताना दिसत आहे.
आविष्कार बिग बॉस मराठी सिझन 3 मध्ये दिसून आला होता. त्याचा खेळसुद्धा प्रेक्षकांना आवडत होता. त्याने कार्यक्रमात कधीच आपल्या आधीच्या रिलेशन अथवा लग्नाबद्दल फारसं भाष्य केलं नाही. पण स्नेहा आणि आविष्कार घरात एकत्र वावरताना दिसून आले होते. स्नेहा आणि आविष्कार हे एकमेकांचे पूर्व पती पत्नी आहेत. स्नेहा 19 वर्षांची असताना हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. पण त्यांचं हे नातं फारकाळ टिकलं नाही आणि दोघांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला. आविष्कारशी स्नेहाचं लग्न अगदीच कमी वयात झालं होतं. पण आविष्कार स्नेहाल मारहाण करायचा आणि त्याने अनेकदा तिला लोकांच्या देखत मारहाण केल्याचा खुलासा स्नेहाने केला होता. आविष्कार आणि स्नेहा एकत्र येणार अशा बातम्या सुद्धा मागच्या काळात जोर धरत होत्या. मात्र त्यांना अफवेचं नाव देत स्नेहाने विषयावर पडदा टाकला.