या पोस्टला फॅन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. परंतु ही पोस्ट अमिताभ यांच्यासाठी विशेष ठरली कारण त्यांची नात नव्या नवेलीने आपल्या आजोबांच्या या पोस्टवर विशेष कमेंट केली आहे. हे वाचा - Dostana 2 मधून कार्तिक आर्यनला हटवताच करण जोहर अडचणीत; निर्णय पडणार महागात अमिताभ यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, हा माझा पहिला लाईव्ह परफॉर्मन्स. तुम्हाला माझ्या मागे जो साईन बोर्ड दिसतो आहे तो मॅडिसन स्क्वेअर न्यूयॉर्कचा (Madison Square New York) आहे. जगप्रसिद्ध अशा या स्टेडीअममध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करणारा मी पहिला भारतीय कलाकार आहे. अमिताभ यांच्या या पोस्टवर त्यांची नात नव्या नवेलीने हार्ट इमोजी टाकत आपल्या आजोबांविषयी प्रेम व्यक्त केलं आहे. फॅन्सदेखील सातत्याने या पोस्टवर कमेंटस (Comments) करताना, पोस्ट लाईक करताना दिसत आहेत. हे वाचा - सिम्पल कपडे, साधी सजावट; अभिनेत्री दिया मिर्झाने का केलं नाही थाटामाटात लग्न? अमिताभ बच्चन यांचा पुढील चित्रपट ब्रम्हास्त्र असून त्यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. तसंच मौनी रॉयदेखील या चित्रपटात विशेष भूमिका साकारत आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Entertainment, Navya naveli