मुंबई, 29 जुलै: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) अनेक कलाकार नेपोटिझम, नैराश्य, बॉलिवूडमधील फेव्हरेटिझम याबाबत भाष्य करत आहेत. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) ने तर या दीड महिन्याच्या कालवधीमध्ये अनेक वक्तव्य केली आहेत. नेपोटिझम या मुद्द्यावरून तिने अनेकांना लक्ष्य देखील केले आहे. दरम्यान कंगनाचे ट्विटर हँडल हाताळणाऱ्या तिच्या टीमने आता अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे.
आता कंगनाच्या या टीमने दीपिकावर जेएनयूच्या निषेधादरम्यान उपस्थित राहण्याबाबत कट रचल्याचा आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर बहिष्कार टाकल्याचा आरोप केला आहे. तिच्या टीमने नुकताच एका वेबसाइटवरील लेखाचा स्क्रीनशॉट ट्विट केला आहे ज्यामध्ये असे लिहिण्यात आले आहे की दीपिकाने सुशांत आणि कंगना दोघांनाही लग्नासाठी आमंत्रित नाही. कंगनाच्या टीमने एक फोटो देखील या ट्वीटबरोबर पोस्ट केला आहे.
(हे वाचा-सुशांतच्या मृत्यू प्रकरणी गृहमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक)
This is a picture and article from Deepika Ranveer wedding, they called Pakistani agent and conspired JNU protest but boycotted only two top stars one is killed other one fighting for her survival #justiceforshushantsinghrajput #Deepika pic.twitter.com/Xo0OcZIfqq
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 29, 2020
हे ट्वीट शेअर करताना तिने असे कॅप्शन दिले आहे की, 'हा फोटो आणि लेख दिपिका रणवीरच्या लग्नाबाबतचा आहे. त्यांनी पाकिस्तानी एजंटला बोलावले आणि जेएनयू निषेधासंदर्भातील कट रचला, पण दोन सर्वोच्च कलाकारांवर त्यांनी बहिष्कार टाकला. त्यातील एकाची आता हत्या करण्यात आली आहे तर दुसरा जगण्यासाठी लढत आहे.'
(हे वाचा-'सत्याचा विजय होतो',रियावर FIR दाखल झाल्यानंतर EX-गर्लफ्रेंड अंकिताचे सूचक ट्वीट)
दरम्यान मंगळवारपासून सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुरू असणाऱ्या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत एफआयआर दाखल केल्यानंतर बिहारच्या 4 पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली आहे.