Home /News /entertainment /

'सुशांत सिंहला कोणी स्टार मानतचं नव्हते मात्र मृत्यूनंतर...'; अभिषेक कपूरचा धक्कादायक खुलासा

'सुशांत सिंहला कोणी स्टार मानतचं नव्हते मात्र मृत्यूनंतर...'; अभिषेक कपूरचा धक्कादायक खुलासा

'केदारनाथ' (Kedarnath) चित्रपटाचा निर्माता अभिषेक कपूरने (Abhishek Kapoor) सुशांतसोबतचे त्याचे नाते आणि समाजाच्या बदलत्या चेहऱ्याबद्दल नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.

    मुंबई, 11 डिसेंबर: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) या जगात नसला तरी छोट्याशा फिल्म करिअरमुळे तो आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. सुशांत सिंहने फार कमी काळात अशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले, ज्यामुळे तो कायम स्मरणात राहील. सुशांतचा 'केदारनाथ' (Kedarnath) चित्रपट रिलीज होऊन 3 वर्षे झाली आहेत. हा चित्रपट सुपरहिट ठरला नाही, पण चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. उत्तराखंडमधील केदारनाथ येथील आपत्तीवर हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात सुशांतसोबत सारा अली खान दिसली होती. साराचा हा डेब्यू चित्रपट होता. 'केदारनाथ' (Kedarnath) चित्रपटाचा निर्माता अभिषेक कपूरने (Abhishek Kapoor) सुशांतसोबतचे त्याचे नाते आणि समाजाच्या बदलत्या चेहऱ्याबद्दल नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.चित्रपट निर्माते अभिषेक कपूरने (Abhishek Kapoor) नुकतेच सांगितले की, 'केदारनाथ' चित्रपटादरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या चित्रपटासाठी कोणीही एकही पैसा गुंतवायला तयार नव्हतं. कारण लोकांना वाटत होते की, सुशांत स्टार नाही. 'इंडिया टुडे'शी बोलताना अभिषेक म्हणाला, 'यात काही विचित्र वाटलं नाही. सुशांत स्टार नाही असे म्हणत लोक 'केदारनाथ' चित्रपटाला नकार देत होते. वाचा : कतरिना - विकीच्या हळदीचे FIRST PHOTO आऊट, रंगले प्रेमाच्या रंगात तरी देखील मी या चित्रपटासाठी लढत होतो, असे त्याने सांगितले. हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी, मी माझे स्वतःचे पैसे यावर लावले. माझ्यावर खूप दबाव होता, पण माझा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मला हा चित्रपट पूर्ण करायचा होता. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याला जगभरातून मिळाले हे देखील अभिषेकने सांगितले. तो पुढे म्हणाला की, मला माहित आहे की केदारनाथ बनवताना सुशांतला वेदना झाल्या होत्या. मात्र सुशांतने जग सोडल्यानंतर लोक त्याचे चाहते झाले. क्षणभर मला सगळं नाहीसे झाल्यासारखे वाटले. ही आपली खरं तर शोकांतिका आहे. वाचा : Good New! लाफ्टरक्वीन भारती होणार आई, म्हणाली- हेच होतं आमचं मोठं सरप्राइज अभिषेक कपूर म्हणाला की, खरं तर आपल्या आजूबाजूला अशी व्यवस्था आहे यामुळे लोक आपल्यावर किती प्रेम करतात यावर विश्वास ठेवता येत नाही. नुकतीच 'केदारनाथ'चियी रिलीजला 3 वर्षे पूर्ण झाली. यावेळी अभिषेकने इंस्टाग्राम पोस्टद्वारे सुशांतला श्रद्धांजली वाहिली. नुकताच अभिषेक कपूर दिग्दर्शित 'चंदीगढ करे आशिकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये आयुषमान खुराना आणि वाणी कपूर दिसत आहेत.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Sushant Singh Rajpoot

    पुढील बातम्या