मुंबई, 23 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रविवारी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केल होतं. काही घटना वगळता या कर्फ्यूचं मोठ्या उत्साहात पालन करण्यात आले. दरम्यान कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवण्याचं काम जे काही सेवादाते करत आहेत, त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ठिक 5 वाजता टाळ्या-थाळ्या वाजवण्याचं आवाहन देखील पंतप्रधानांनी केलं होतं. अगदी पंतप्रधानांच्या आईपासून अनेकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला होता.
(हे वाचा-दुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारी कनिका काही वर्षांपूर्वी घेणार होती स्वत:चा जीव)
दरम्यान प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) या कालावधीत अमेरिकेमध्ये आहे. मात्र अमेरिकेत असून देखील तिने घराबाहेर उभं राहून भारतातील सेवादात्यांसाठी टाळ्या वाजवल्या. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता अनेक सेलिब्रिटींनी घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. प्रियंका देखील सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत असते. नुकताच तिने नवरा निक जोनसबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने Stay at Home असा सल्ला दिला होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO-World Health Organisation) ने दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) या अभिनेत्रींना देशभरात जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. आपल्या देशामध्ये कलाकारांना फॉलो करणारे अनेक जण आहेत. अशापरिस्थित दीपिका किंवा प्रियांका या सेलिब्रिटींनी कोरोनाबाबत जनजागृती केली तर कोरोनाबाबतची घ्यावयाची काळजी सर्वांपर्यंत पोहोचेल या उद्देशाने WHO ने हे आवाहन केले होते.