मुंबई, 06 मे : बॉलीवूड अभिनेत्री आथिया शेट्टी अलिकडच्या काळात भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. दोघांनीही अजुन त्यांच्या नात्याबद्दल काही स्पष्ट केलेलं नाही. मात्र अधूनमधून त्यांचे एकत्र फिरत असलेले तसंच एकमेकांसोबतचे फोटो व्हायरल होत असतात. दरम्यान, आता आथियाने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे दोघांमध्ये काही बिनसलं की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
इन्स्टाग्रामवर आथियानं एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत आथियानं केएल राहुलला क्रॉप केलं आहे. आथिया फोटोत पूर्ण दिसत असून तिनं केएल राहुलला क्रॉप केलं आहे. यामध्ये त्याचा हात दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिनं म्हटलं की, एका स्वप्नासारखं वाटत आहे.
फोटो क्रॉप केल्यानं तसंच त्याला दिलेल्या कॅप्शनमुळे चाहत्यांनी दोघांमध्ये काही बिनसलं का असंही कमेंटमध्ये विचारलं आहे. दोघांच्या रिलेशनमध्ये अंतर तर पडलं नाही ना असा प्रश्न चाहते विचारत आहे. आथियाच्या फोटोवरच चाहत्यांनी प्रश्न विचारले आहेत.
हे वाचा : अरे बापरे! दिशा पाटनीला म्हणते, देवाने मला चार बॉयफ्रेंड दिले तर...
गेल्या महिन्यात केएल राहुलचा वाढदिवस होता. तेव्हा आथियाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यात आथियाने लिहिलं होतं की,'हॅपी बर्थडे माय पर्सन' केएल राहुलनेसुद्धा यावर लव्ह इमोजी टाकत रिप्लाय दिला होता.
पाहा PHOTO : लॉकडाऊनमध्ये मीमकरांची क्रिएटीव्हिटी! 'वर्क फ्रॉम होम'वर बनले शेकडो मीम्स