मुंबई, 3 मे : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘पाणी फाउंडेशन’च्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे चर्चेत आहे. पण या सामाजिक कार्यासोबतच आमिर त्याच्या आगामी सिनेमाचीही तयारी करत आहे. आमिर त्याच्या प्रत्येक सिनेमातील भूमिकेसाठी खूप मेहनत घेताना दिसतो. तो लवकरच ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये दिसणार असून यातील भूमिकेसाठी आमिर सध्या जिममध्ये घाम गाळत आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला 20 किलो वजन कमी करायचं असल्याचं बोललं जात आहे. ‘लाल सिंह चढ्ढा’ हा सिनेमा ‘फॉरेस्ट ग्रम्प’ या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमाच दिग्दर्शन अद्वैत चंदन करत असून अद्वैतनं याआधी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या आमिरच्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आमिर खान ‘लाल सिंह चढ्ढा’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि यासाठी तो 20 किलो वजन घटवणार आहे. अशाप्रकारे एखाद्या सिनेमासाठी वजन घटवण्याची किंवा वाढवण्याची आमिरची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यानं ‘गजनी’ आणि ‘दंगल’ या सिनेमांसाठी वजन वाढवून नंतर पुन्हा घटवलं होतं. एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आमिर नेहमीच त्याचे पूर्ण प्रयत्न करतो त्यामुळेच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं.
दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’ आमिरच्या या नव्या सिनेमाची जोरदार तयारी सुरू असून आमिरनं आता या सिनेमाची लोकेशन्स शोधायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी आमिर लोकेशन्स शोधण्यासाठी धर्मशाला येथे गेला होता. यावेळी आमिर आणि त्याच्या टीमनं त्याठीकाणी बराच वेळ घालवला. सिनेमासाठी वेगवेगळ्या आयडियाजवर चर्चा केली. तसेच याठीकाणी असलेली आसपासची लोकेशन्सही पाहिली. या प्रेक्षकांना आमिरच्या या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत कारण, मागील वर्षा आलेला त्याचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडू शकला नव्हता. तसेच या सिनेमावर समीक्षक आणि प्रेक्षकांनी टीकाही केली होती. जे संजय-सलमानला जमलं नाही ते ‘बादशाह’ने करून दाखवलं रात्रीस खेळ चाले : काशी शेवंताच्या घरी येतो आणि…