काशीचं शेवंताबद्दलचं वेड काही कमी होत नाहीय. मी अण्णा नाईक, शेवंताला भेटायचंय, म्हणत म्हणत तो सगळ्यांनाच बेजार करतोय. अण्णांच्या वाड्यात माई जिन्यावरून पडल्यात. पण तरीही अण्णा जेवणात मासे हवेतच म्हणून अडून बसतात. अण्णा शेवंताच्या घरी येतात. तिथे पाटणकर असतात. म्हणून ते निघून जातात. इकडे काशी चोंगट्यासोबत शेवंताच्या घराजवळून जातो. शेवंता दिसते का म्हणून पहायला लागतो. पहिल्यांदाच काशी शेवंताला पाहतो. तो तिच्या घरी येतो आणि म्हणतो मी अण्णा नाईक.