'डीजे वाले बाबू', 'कर गई चुल' आणि 'मर्सी' सारख्या सुपरहिट गाण्यांचा निर्माता आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅप गायक बादशाहनं नुकतीच 10 कोटीची रॉल्स रॉयस कंपनीची 'Wraith' ही कार खरेदी केली. या गाडीचा फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींच्या महागड्या गाड्यांची चर्चा सुरू झाली. पण आता पर्यंत बॉलिवूडमध्ये बादशाह एवढी महागडी कार कोणालाच खरेदी करता आलेली नाही. पाहूयात कोणकोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींकडे आहेत महागड्या कार…
अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत 'राजमा चावल' या सिनेमात काम केलेली अभिनेत्री अमायरा दस्तूर हिनंही आपल्या स्वप्नातील कार खरेदी केली आहे. अमायराकडे मर्सिडीज GLC ही कार आहे. ही कार करेदी करून तिनं आपलं स्वप्न पूर्ण केलं.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त स्पोर्ट्स कारचा चाहता आहे. त्याच्याकडे 3 कोटी रुपये किंमतीची फरारी 599 GTB ही कार आहे.
बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्येही चांगलं यश मिळवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राकडे अनेक कारचं कलेक्शन आहे. मात्र यामध्ये तिच्याकडे असेलेली रॉल्स रॉयसची 2 कोटी रुपये किंमतीची कार सर्वाधिक महागडी कार आहे.
बेबी डॉल सनी लिओनीकडेही एक महागडी कार आहे. 1.5 कोटी रुपये किंमतीची Maserati ही कार सनीला तिचा पती डॅनिअल वेबरनं गिफ्ट दिली आहे.
अभिनेता अजय देवगणला वेगवान कारची आवड आहे. त्याच्या शानदार कार कलेक्शनमध्ये Maserati Quattroporte या कारचा समावेश आहे. ज्या कारची किंमत 1.4 कोटी एवढी आहे.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडेही गाड्याचं चांगलं कलेक्शन आहे. पण यातील रॉल्स रॉयस फॅन्टम ही सर्वात महागडी कार आहे. त्यांनी ही कार 2013मध्ये खरेदी केली होती. या कारची किंमत 3.5 कोटी रुपये एवढी आहे.
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानकडे स्पेशल बुलेटप्रुफ कार आहे. आमिरच्या या Mercedes-S600 लक्झरी सेडानची किंमत 10 कोटी रुपये एवढी आहे.
रोमांस किंग शाहरुख खानकडेही महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. त्यातील त्याच्या Bugatti Veyron कारची किंमत 12 कोटी रुपये आहे.