जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Amir Khan: लाल सिंह चड्ढाच्या अपयशाची जबाबादारी कोणाची? आमिरनं दिलं स्पष्टीकरण, घेतला मोठा निर्णय

Amir Khan: लाल सिंह चड्ढाच्या अपयशाची जबाबादारी कोणाची? आमिरनं दिलं स्पष्टीकरण, घेतला मोठा निर्णय

Amir Khan: लाल सिंह चड्ढाच्या अपयशाची जबाबादारी कोणाची? आमिरनं दिलं स्पष्टीकरण, घेतला मोठा निर्णय

लाल सिंह चड्ढा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला हे आता समोर आलं आहे. पण सिनेमाच्या अपयशाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न समोर आला आहे. यावर आमिरनं स्पष्टीकरण दिलं असून एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 ऑगस्ट: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे असा अभिनेता आमिर खान. मात्र मागचे काही वर्ष आमिरच्या सगळ्या गोष्टी इम्परफेक्ट होताना दिसत आहेत. आमिरच्या सलग दुसऱ्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.  नुकताच प्रदर्शित झालेल्या लाल सिंह चड्ढा हा सिनेमा प्रेक्षकांनी बायकॉट केला. सिनेमावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आल्यानं सिनेमागृहात सिनेमा चांगली कामगिरी करु शकला नाही. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्याच लाल सिंह चड्ढा या सिनेमानं  केवळ 48 कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर सिनेमा सपशेल फ्लॉप ठरला हे आता समोर आलं आहे. सिनेमाचं अपयश पचवणं सर्वांसाठी कठीण आहे मात्र आमिरसाठी ते जास्तचं कठीण होऊन बसलं आहे. सिनेमाच्या अपयशाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न समोर आला आणि या प्रश्नाचं उत्तर आमिरनं दिलं असून एक मोठा निर्णय घेतला आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमाची कमाई न झाल्यानं सिनेमाच्या मागे काम करणाऱ्या मोठ्या टीमला देखील मोठा फटका बसला आहे. सिनेमाच्या वितरकांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांनाच याची झळ बसणार आहे.  आमिरला देखील याचा मोठा धक्का बसला असून सिनेमाच्या अपयशानं तो देखील दु:खी झाला आहे.  आमिर आणि त्याची एक्स पत्नी किरण राव यांच्या फार जवळच्या व्यक्तीनं एका पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी ही अभिनेता आमिर खाननं घेतली आहे.  सिनेमा फ्लॉप झाल्यानं वितरकांचं झालेलं सगळं नुकसान आमिर भरुन देणार असल्याचा निर्णय त्यानं घेतला आहे. हेही वाचा - Sita Ramam: आमिर अक्षयचे सिनेमे फेल; बॉक्स ऑफिसवर साऊथच्या स्मॉल बजेट फिल्मची चलती लाल सिंह चड्ढा हा सिनेमा फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. सिनेमाचे राइट्स विकत घेण्यापासून आमिरनं मेहनत घेतली होती मात्र त्याचे हे सगळे प्रयत्न पाण्यात गेले असंच म्हणण्याची वेळ आली आहे.  इतकंच नाही लाल सिंह चड्ढा हा सिनेमा देशातील वेगवेगळ्या 100 लोकेशन्स वर 200 दिवस शुट करण्यात आला होता. आमिरनं त्याच्या लुकवरही प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र बॉलिवूड सिनेमा पाहणारा प्रेक्षकही आता सजक झाला असून त्यांनीही सिनेमावर बहिष्कार घालून सिनेमा फ्लॉप केला. लाल सिंह चड्ढा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच नेटकऱ्यांकडून सिनेमा बायकॉट करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. सिनेमाच्या माध्यमातून आमिरनं भारताचा अपमान केला आहे. देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आमिर करत असल्याचं आरोप करण्यात आला. आणि अखेर प्रेक्षकांनी लावून धरलेली ही मागणी खरी ठरली आणि सिनेमा फ्लॉप झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सिनेमानं 11.7 कोटी कमावले, शुक्रवारी 7.26 कोटी तर शनिवार रविवारी 18 कोटी आणि सोमवारी 9 कोटींची कमाई केली. अशाप्रकारे सिनेमाने एकूण 47 कोटींची कमाई केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात