जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ira Khan : वडिलांमुळे डिप्रेशनमध्ये होती आमिरची लेक; दर 8 महिन्यांनी व्हायची वाईट अवस्था

Ira Khan : वडिलांमुळे डिप्रेशनमध्ये होती आमिरची लेक; दर 8 महिन्यांनी व्हायची वाईट अवस्था

 इरा खान

इरा खान

आमिरची लेक इराने आरोग्याविषयी एक खुलासा केला आहे. इराने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान तिच्या नैराश्यासोबतच्या लढाईबद्दल सांगितलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 जुलै :  आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच चर्चेत असते. चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती कायम लाइमलाईट मध्ये असते. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आली होती. तिने मराठमोळ्या नुपूर शिखरे सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता इराने आरोग्याविषयी एक खुलासा केला आहे. इराने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान तिच्या नैराश्यासोबतच्या लढाईबद्दल सांगितलं आहे. इरा 5 वर्षांहून अधिक काळ नैराश्याशी लढत आहे. तिने सांगितले की तिच्या आई वडिलांच्या विभक्त होण्याचा तिच्यावर फारसा परिणाम झाला नाही, पण दीड वर्षांपासून ती उदास होती. एवढंच नाही तर तिने जेवण देखील बंद केलं होतं. आयराने सांगितले की, तिच्या कुटुंबात सुरुवातीपासूनच मानसिक आरोग्याच्या तक्रारी आहेत. इरा खानने नुकतेच मानसिक आरोग्याला  पाठींब्या देण्यासाठी ऑगस्टू फाउंडेशन सुरू केले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

इरा खानने नुकताच खुलासा केला की, तिचे वडील आमिर खान आणि आई रीना दत्ता हे ऑगस्टू फाउंडेशनच्या सल्लागार मंडळाचा भाग आहेत. संस्थेला योग्य तो निधी मिळण्यासाठी त्यांनी खूप मदत केली असल्याचं देखील सांगितलं. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत इराने तिच्या डिप्रेशनबद्दल खुलासा केला आहे. तिने ती डिप्रेशनमध्ये असताना ‘ती दिवसातून 8 तास रडायची आणि 10 तास झोपायची’ असं सांगितलं आहे. Hema Malini: ‘त्याने मला साडीची पिन काढायला लावली…’ हेमा मालिनींचा त्या निर्मात्याविषयी धक्कादायक खुलासा इरा खान म्हणाली की, ‘मी नेदरलँडमध्ये शिकत होते तेव्हा अचानक मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आई रीनाने मला धीर दिला.’ तेव्हाच ती डिप्रेशनमध्ये होती. ती म्हणाली की, ‘मला वाटायचं मला जगायचं नाही, म्हणून मी जास्त झोपायचे. तिने असेही सांगितले की, जरी तिच्या पालकांच्या घटस्फोटाचा तिच्यावर फारसा परिणाम झाला नाही, पण ती डिप्रेशनमध्ये का होती हे तिला मात्र समजलं नसल्याचं तिने सांगितलं. इरा खान म्हणाली, ‘मी कोणालाही सांगितले नाही कारण त्यांना माझी जास्त काळजी वाटली असती. हा प्रकार दीड वर्ष चालला. मी चार चार दिवस जेवायचे नाही.’ इराने पुढे सांगितले की, ‘नैराश्य कायमचे टिकत नाही, परंतु मी दर 8-10 महिन्यांनी नैराश्यात जात होते. दर 8-10 महिन्यांनी मला मोठ्या मानसिक अपघाताला सामोरं जावं लागायचं. ते कधी अनुवांशिक असतं, कधी मानसिक तर कधी समाजामुळे असतं.’ असा खुलासा तिने केला. इरा खान म्हणाली, “मला हे समजायला थोडा वेळ लागला. पण माझ्या कुटुंबातच मानसिक आजाराचा त्रास आहे.  गेल्या वर्षी जुलैमध्ये मी खूप उदास होते. मी माझी औषधे घेणं बंद केलं होतं आणि माझे वजनही खूप वाढलं होतं. पण मी मेहनत करून माझं मानसिक आरोग्य नीट केलं आणि त्यातून बाहेर पडत स्वतःला सावरलं.’ असं ती म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात