Home /News /entertainment /

नवोदित कलाकारांसाठी उत्तम संधी; Aai Kuthe Kay Karte मालिकेतील अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

नवोदित कलाकारांसाठी उत्तम संधी; Aai Kuthe Kay Karte मालिकेतील अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकापैकी एक मालिका आहे. या मालिकेतील एका अभिनेत्रीने मोठी घोषणा केली आहे. यामुळे नवीन कलाकारांना त्यांचा अभिनय दाखवण्याची संधी मिळणार आहे.

  मुंबई , 21 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकापैकी एक मालिका आहे. ही मालिका सध्या एक रंजक वळणावर आहे. मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट ' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) पाहायला मिळतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. त्यामुळे मालिकेत अरुंधतीला घरकामात मदत करणारी त्यांची कामवाली अर्थात विमलचे पात्र कोकणी बाजातील बोलण्याने प्रेक्षकांना खूपच भावले आहे. विमलचे पात्र साकारणाऱ्या सीमा घोगळे या प्रसिद्ध नाट्यकर्मी अनंत घोगळे यांच्या कन्या आहेत. सीमा ( seema ghogale )यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. “अनंत घोगळे करंडक” राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा लवकरच…अशी घोषणा सीमा घोगळे यांनी केली आहे. त्यामुळे नवख्या कलाकारांना अनंत घोगळे प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून अभिनयाची चांगली संधी उपलब्ध होणार आहे. सीमा घोगळे यांनी इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, “मागची दोन वर्षे खूप प्रयत्न करतेय पण ह्यावर निर्बंध घालण्यात आले म्हणून मनात असूनसुद्धा काही गोष्टी करता आल्या नाहीत.. आता हळूहळू सगळं सुरळीत होतंय आणि यापुढेही ते तसंच सुरळीत राहावं ह्यासाठी आपण सगळेच प्रार्थना करूया… बाबा, आज तुमचा तृतीय स्मृतिदिन …तुम्हाला विनम्र अभिवादन…”अनंत घोगळे प्रतिष्ठान” आयोजित “अनंत घोगळे करंडक” राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा लवकरच…अशी घोषणा सीमा घोगळे यानी केली आहे. त्यामुळे नवख्या कलाकारांना अनंत घोगळे प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून अभिनयाची चांगली संधी उपलब्ध होत आहे. येत्या काही दिवसातच याबाबत अधिक माहिती सविस्तर दिली जाईल असेही त्या म्हनाल्या . त्यांच्या या घोषणेचे अनेक कलाकारांनी स्वागतच केले आहे.
  गेल्या अनेक वर्षांपासून अनंत घोगळे हे नाट्यसृष्टीशी संलग्न होते. मात्र ऑक्टोबर 2018 साली वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गेल्या 60 वर्षा पासून ते नाट्यक्षेत्रात काम करत होते.अनंत घोगळे यांनी मासिके, नियतकालिके, स्मरणिका, दैनिकांतून नाट्यविषयक घडामोडींवर लेखन केले होते. ‘नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर स्मृती नाट्यसेवा’ पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते. वाचा : Aai Kuthe Kay Karte : संजनाशी लग्नानंतर अनिरुद्धचा आणखी एक मोठा निर्णय अनंत घोगळे यांच्या प्रतिष्ठान अंतर्गत एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात येते असे. त्यातून अनेक नवख्या कलाकारांना रंगभूमीवर आपली कला सादर करण्याची संधी मिळत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सरकारच्या  कोरोना निर्बंधांमुळे ह्या स्पर्धांचे आयोजन करण्यात दिरंगाई होत होती. पण नुकतेच निर्बंध हटवल्याने आता पुन्हा नव्या दमाने ह्या एकांकिका स्पर्धा आयोजित करण्याचे  त्यांची मुलगी अभिनेत्री  सीमा घोगळे यांनी ठरवले आहे. वाचा : आज काचेच्या आडून आर्यनने घेतली बापाची भेट; प्रत्यक्ष भेटीसाठी मोठी प्रतीक्षा सीमा घोगळे या मराठी चित्रपट मालिका तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. सीमा यांना आपण याआधी गोठ या प्रसिद्ध मालिकेतून पाहिलं आहे. तसेच एक होती राजकन्या या मालिकेतही त्या होत्या. या मालिकेत त्यांनी एका पोलीस अधिकारी महिलेची भूमिका साकारली होती. त्यांच्या अन्य मालिकाही गाजल्या. पण त्यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांना अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली ती रंगभूमीवरील कामाने.  सध्या त्यांची आई कुठे काय करते या मालिकेतील भूमिका चांगलीच गाजत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या