मुंबई , 21 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकापैकी आहे. ही मालिका सध्या एक रंजक वळणावर आहे. मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट ’ (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) पाहायला मिळतात. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाल्यानंतर देशमुख कुटुंबात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. संजना लग्न करून घरात आल्यामुळे दररोज नवनवीन वाद रंगत आहेत. आई-आप्पा संजनाच्या रोजच्या वादाला कंटाळले आहेत. आता अशा स्थितीमध्ये त्यांच्यासमोर आता एक नवीन संकट उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे संजनाचे ऐकून आता अनिरुद्ध आई-आप्पांची साथ म्हणजे घर सोडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संजनाने अनिरुध्दशी लग्नही केलं आणि देशमुखांच्या घरात सून म्हणून दाखल झाली आहे. यानंतर आप्पांनी अरुंधतीला लेक मानून घराचा अर्धा हिस्सा तिच्या नावावर केला आहे. अरुंधती आता स्वावलंबी बनली आहे व स्वत:च्या पायावर ती उभी आहे. आश्रमाच्या ऑफीसात नोकरी करणारी अरुंधती मुलं व आई-आप्पांवर लक्ष ठेवण्यासाठी समोरच गौरीकडे राहिला आली आहे. अविनाशची कर्जाची नड भागविण्यासाठी अरुंधतीने यशच्या मदतीने व आप्पांच्या कानावर घालून राहतं घरं गहाण ठेवलंय. साखरपुडा ते लग्नसोहळा; क्युट कपल सुयश टिळक-आयुषी भावेच्या खास क्षणांचे PHOTO वाचा : समृद्दीमधील तिचा हिस्सा तारण ठेवत पैसा उभा केला आणि अविनाशला मरणयातना भोगण्यापासून वाचवलं आहे.सुरुवातीला याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ते फक्त यश, आप्पा आणि अरुंधती यांनाच हे माहिती होते. यश जेव्हा गौरीला हे सांगत होता तेव्हा संजनाने हे ऐकले. त्यानंतर तिने याचा उपयोग करत देशमुखांच्या घरात यांचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
यामुळे सध्या देशमुख कुटुंबात नवं वादळ उभं राहिलं आहे. या संकटात आप्पा जरी अरुंधतीला साथ देत असले. तरीदेखील घरातील अन्य सदस्य अरुंधतीवर नाराज आहेत. यामध्येच संजना अनिरुद्धला घरातून वेगळं होण्याचा सल्ला देते. स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या नव्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. वाचा : ओळखलं का या चिमुकल्याला आज आहे ‘तारक मेहता…‘मध्ये महत्वाच्या भूमिकेत दरम्यान, संजना आणि अनिरुद्ध त्यांच्या वाट्याला आलेला हिस्सा विकणार असून ते दोघंही देशमुख बंगल्यातून बाहेर पडणार आहे. इतकंच नाही तर या संकटकाळात अनिरुद्ध आई-आप्पांना एकटं सोडणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काय होणार हे येणाऱ्या भागातच समजणार आहे.