Home /News /entertainment /

आज काचेच्या आडून आर्यन खानने घेतली बापाची भेट; मात्र प्रत्यक्ष भेटीसाठी मोठी प्रतीक्षा

आज काचेच्या आडून आर्यन खानने घेतली बापाची भेट; मात्र प्रत्यक्ष भेटीसाठी मोठी प्रतीक्षा

आजही आर्यन खान याला जामीन मिळाला नाही. हा महिना आर्थर रोड तुरुंगातच काढावा लागणार.

    मुंबई, 21 ऑक्टोबर : शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 3 ऑक्टोबर रोजी एनसीबीने (NCB) त्याला अटक केली होती. मात्र अद्यापही त्याला जामीन मिळू शकलेला नाही. आजही मुंबई कोर्टाने आर्यन खान याचा जामीन अर्ज (Aryan Khan's bail application rejected) फेटाळला आहे. आजच आर्यन खान याचे वडील शाहरूख खान त्याच्या भेटीसाठी आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) आला होता. साधारण 16 ते 18 मिनिटं दोघांचं बोलणं झालं. भेटीदरम्यान वडील आणि मुलादरम्यान काच होती. याच्या आडून दोघांमध्ये संवाद झाला. दोघांची इंटरकॉमच्या माध्यमातून बातचीत झाली. यावेळी तुरुंगाचे अधिकारीही उपस्थित होते. कोरोनामुळे कैदींच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटीची परवानगी नाही. यापूर्वी शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हिने व्हिडीओ कॉलवरुन आर्यनशी बातचीत केली होती. (Aryan Khans bail application rejected again, he will remain in Arthur Road Jail until October 30) हे ही वाचा-10 मिनिटांच्या भेटीत काय झाला बापलेकात संवाद?आर्यनला गजाआड पाहताच शाहरुख भावुक आर्यन खान गेल्या 14 दिवसांपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. एनसीबीने त्याच्यावर ड्रग्ज घेणे आणि इंटरनॅशनल ड्रग्ज ट्रॅफिकिंगशी संबंधित आरोप लावला आहे. आर्यन खानच्या जामीनाचा अर्ज आजही कोर्टाने फेटाळला असून 30 ऑक्टोबरपर्यंत त्याला आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागणार आहे. दरम्यान आर्यन खान याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aryan khan, Drugs, Mumbai, NCB, Shahrukh khan

    पुढील बातम्या