मुंबई, 28 मार्च : आई कुठे काय करते ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. दर्जेदार कथानक असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, यश, अभि, अनघा, आशुतोष, आप्पा -कांचन ही पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. प्रत्येक घरात अशी माणसं आपल्याला भेटतात. त्यामुळे ही सगळी पात्र प्रेक्षकांना आपली वाटतात. मालिका यशाच्या शिखरावर येण्यात या कलाकारांइतका किंवा त्याहून अधिकचा वाटा हा मालिकेच्या संपूर्ण टीमचा आहे. मालिकेच्या लेखिकेचा आहे. नमिका वर्तक या मालिकेचं लेखन करतात. प्रेक्षकांना दररोज पाहायला मिळणारे एपिसोड नमिता वर्तक या लिहीतात. पण मालिकेच्या लेखिका सध्या फार वाईट परिस्थितीतून जात आहे. एकावेळी मायेचं छत्र हिरावल्यानं त्या मोठ्या दु:खाचा सामना करत आहे.
मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. ते नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट लिहिल त्यांच्या मनातील भावना मांडत असतात. यावेळी त्यांनी मालिकेच्या लेखिका नमिता वर्तक यांच्या आयुष्यातील वाईट घटना सांगितली. नमिता वर्तक यांच्या वडिलांचं 15 दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर लगेच 16 दिवसांनी त्यांच्या आईला देखील देवाज्ञा झाली. नमिता वर्तक म्हणजे ज्येष्ठ प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांची कन्या. कमलाकर नाडकर्णी अनेक महिने आजारी होते. त्यांची सुश्रृषा करण्यासाठी नमिता अनेक दिवस दवाखान्यात होत्या. दवाखान्यात बसून त्यांनी आई कुठे काय करतेचे एपिसोड लिहिले आहेत, असं मिलिंद गवळी यांनी सांगितलं.
हेही वाचा - दीपा-कार्तिक करणार पाचव्यांदा लग्न; एपिसोड पाहून प्रेक्षक म्हणाले, आता मुलींची लग्न करण्यांची वेळ आणि...
View this post on Instagram
एक कलाकृती, एक सीन पडद्यावर येण्यामागे अनेक लोकांची मेहनत असते. ज्याला आपण BTS म्हणतो. याचा BTSचा अर्थ समजावत मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलंय, "सिरीयल चा 23 - 24 मिनिटाचा एपिसोडसाठी कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरच काही करत असतात , पडद्याच्या मागे खूप काही घडत असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसस नाही. दिसत नाही तो लेखक, जो रात्रंदिवस तो डोकं फोडी करत असतो, आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकाराचा ट्रॅक लोकांना आवडतोय, तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकाराकडे dates available नाहीयेत, तो कलाकार आजारीच पडला आहे, मघ परत लेखक डोके फोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो".
मिलिंद गवळी यांनी पुढे लिहिलंय, "बर लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे पण सगळं आनंदाने करतो. पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल , उलथा पालत होत असेल तर, आई कुठे काय करतेच्या लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते, त्यांची सगळी सुश्रुषा करत करत दवाखान्यात सुद्धा नमिताने आई कुठे काय करतेचे एपिसोड लिहून दिले. 11 मार्चला रात्री दहा वाजता नाडकर्णी काकां गेले, त्या दुःखात सुद्धा आई कुठे काय करतेचे एपिसोड नमिताने लिहून देत होती. काल 27 मार्च रोजी म्हणजे 16 दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आई गेली. नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही. आभाळा एवढं दुःख हेच असतं बहुतेक. हे behind the scenes जे कधी येत नाही प्रेक्षकांसमोर. हे सगळं सहन करायची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना".
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial