मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दीपा-कार्तिक करणार पाचव्यांदा लग्न; एपिसोड पाहून प्रेक्षक म्हणाले, आता मुलींची लग्न करण्यांची वेळ आणि...

दीपा-कार्तिक करणार पाचव्यांदा लग्न; एपिसोड पाहून प्रेक्षक म्हणाले, आता मुलींची लग्न करण्यांची वेळ आणि...

rang majha vegla

rang majha vegla

मालिकेत लिप येण्याआधी कार्तिक आणि दीपाचा मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. त्यानंतर आता दोघे पुन्हा एकदा लग्न करताना दिसणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  28 मार्च :  स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा ही मालिका अनेक दिवस टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे.  काळ्या रंगाचा द्वेष करणारी सौंदर्या. तिचा डॉक्टर मुलगा जो एका गरीब सावळ्या मुलीच्या प्रेमात पडतो असं मालिकेचं सुरूवातीचं कथानक. मालिका जशी जशी पुढे सरकली तसं कथानक हललं आणि मालिक अनेक महिने मालिकेत ननवीन ड्राम पाहायला मिळाला. मालिकेत तब्बल 14 वर्षांची लिप दाखवण्यात आला आहे. साक्षीच्या खुनाच्या आरोपात कार्तिकला 14 वर्षांची शिक्षा होते. या काळात सगळं बदलतं. दीपिका आणि कार्तिकी मोठ्या होतात. तर दुसरीकडे कार्तिकच्या मनात दीपा विषयी असलेला राग आणखी बळावतो. 14 वर्षांनी कार्तिक आता दीपाचा बदला घेणार असल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे.

रंग माझा वेगळा मालिकेचं बदलेलं कथानक बदलल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मालिकेतील समजूतदार कार्तिकी आता फारच हट्टी आणि दीपाचा द्वेष करणारी मुलगी आहे. तर इकडे कार्तिकही दीपाचा सुड घेण्यासाठी नवीन प्लॉन आखत आहे. तोंडावर दीपावर खूप प्रेम असल्याचं दाखवत दुसरीकडे दीपाचा केसानं गळा कापण्याचा प्रयत्न कार्तिक करताना दिसत आहे. मालिकेत लिप येण्याआधी कार्तिक आणि दीपाचा मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. त्यानंतर आता दोघे पुन्हा एकदा लग्न करताना दिसणार आहे. म्हणून आता पर्यंत दोघांनी मालिकेत 5 वेळा लग्न केल्याचं पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: मालिकेत मोठा ट्विस्ट; गौरीने कायमचं तोडलं यशसोबतचं नातं; लेकाला कसं सावरणार अरुंधती?

2 एप्रिलला रंग माझा वेगळा मालिकेचा महाएपिसोड पाहायला मिळणार आहे. ज्यात दीपा आणि कार्तिक मंदिरात जाऊन लग्न करतात. दीपा कार्तिकला म्हणते, "आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे.  अग्नीच्या साक्षीनं आपण पुन्हा एकदा वचनबद्ध होऊ.  माझ्या वाटचं सगळं सुख तुझं.  तुझ्या वाटची सगळी दुख: माझी.  तुझ्यासमोर मृत्यू जरी आला तरी त्याला मी सामोरी जाईन".

महाएपिसोडचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मात्र चांगलीच शाळा घेतली आहे. एका युझरनं लिहिलीय, "ही वेळ तुमच्या मुलींची लग्न करण्याची आहे या वयात तुम्ही काय पुन्हा लग्न करताय. काहीपण दाखवू नका". तर दुसऱ्या युझरनं म्हटलं, "आयुष्यभर फेरेच घेणार दीपा". तर आणखी एका युझरनं लिहिलंय, "चांगलं दाखवा काय तरी. काय दाखवताय हे".

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi language, Marathi news, Marathi Serial