मुंबई, 17 ऑक्टोबर : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची वाढणारी जवळीक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. तर दुसरीकडे यशच्या आयुष्यात नवीन संकट येऊन ठेपलं आहे. आता त्याचबरोबर अरुंधतीचा दुसरा मुलगा अभिच्या आयुष्यात सुद्धा नवीन वळण येणार आहे. काय घडणार आहे मालिकेत जाणून घ्या. अरुंधतीचा मुलगा अभि सध्या विचित्र वागतो आहे. त्याला अरुंधती आणि आशुतोषची जवळीक वाढलेली पटत नाही. तो अरुंधतीच्या कायम विरोधात असतो. तो काही वेळेस अनिरुद्ध सारखाच वागतो असं संजना नेहमी म्हणते. आता त्याची बायको अनघा सध्या प्रेग्नेंट आहे. तिने अरुंधतीकडे जाऊ नये म्हणून अभि वेगवेगळे पर्याय शोधून काढत असतो. अभिच्या याच वागण्यामुळे अनघाला त्रास होत आहे. हेही वाचा - Jeev Majha Guntala : जीव माझा गुंतला मालिका नव्या वळणावर; अंतरा आणि मल्हारच्या आयुष्यात नवा ट्विस्ट सध्या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये अभि घरच्यांना सांगतो कि अनघाला एक प्रकारचा आजार आहे. ज्यामध्ये तिचं हिमोग्लोबिन वाढत नाहीये. ती अराम करत नाही, सारखी बाहेर जाते त्यामुळे तिला हा आजार झालाय असं अभिला वाटतं. त्यावर अनघा म्हणते, ‘‘आपल्या घरात नेहमी विचित्र वातावरण असतं. म्हणून मला बाहेर पडावंसं वाटतं.‘‘हे ऐकून घरच्या सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर अभि म्हणतो ‘‘मला कोणी बेजवाबदार म्हटलेलं मला चालणार नाही. तुला माझ्यामुळे त्रास होतोय का कि त्यावर तुला डॉक्टर ट्रीटमेंट देत आहेत.’’
आता त्यावर अनघा नक्की काय उत्तर देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. घरच्यांसमोर अभिच्या वागण्याचा त्रास होतो हे अनघा कबूल करणार का, त्याचा या दोघांच्या नात्यावर काय परिणाम होईल, अरुंधती घराबाहेर राहून आपल्या मुलांचं आयुष्य सावरू शकेल का या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळतील.
तर दुसरीकडे मालिकेत आई कांचन आणि आप्पा सुलेखा ताईंकडे चहासाठी जाताना दाखवण्यात येणार आहेत. तेव्हाच सुलेखाताई त्यांच्याकडे अरुंधतीला मागणी घालणार आहेत. परंतु, कांचन या गोष्टीला विरोध करत आम्ही तयार झालो तरीही अरुंधती तीन मुलांची आई आहे आणि ती स्वतः या लग्नासाठी तयार होणार नाही असं म्हणतात. त्यावर सुलेखाताईदेखील सडेतोड उत्तर देत तीन मुलांची आई आहे म्हणून तिने आपलं पुढचं आयुष्य एकटीने काढायचं का, तिला आनंदी राहण्याचा हक्क नाहीये का, असं म्हणत त्यांचा मुद्दा खोडून काढताना दिसणार आहेत.

)







