कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' मालिकेने अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. मालिकेत सतत वेगवेगळे ट्विस्ट येत असतात त्यामुळे मालिका रंजक बनते.
रिक्षावाली अंतरा आणि बीझनेस मॅन मल्हार यांची आगळीवेगळी गोष्ट प्रेक्षकांना पसंत पडली. परस्परविरोधी असे मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.
आतापर्यंत अंतरा आणि मल्हारने अनेक कठीण प्रसंगांना मोठ्या धिराने तोंड दिले. आता कुठे या दोघांचा सुरळीत संसार सुरु झाला होता. पण आता या दोघांचं नातं पुन्हा नवीन वळणावर येऊन ठेपलं आहे.
पण मल्हारला मात्र कोणावर अवलंबून राहायचं नाही. त्यामुळे तो आपण नवीन घर शोधू असं अंतराला सांगतो आणि ती सुद्धा ते लगेच मान्य करते.
आता नवीन घरात त्यांचं नातं फुलणार असून दोघे मिळून सगळ्या संकटांचा सामना करणार आहेत. त्यामुळे मालिकेचे आगामी भाग पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.