मुंबई, 25 ऑक्टोबर : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची वाढणारी जवळीक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. पण आता सध्या या मालिकेचा ट्रॅक बदललेला पाहायला मिळतोय. ऐन दिवाळीत अरुंधती मालिकेतून गायब झाली आहे. पण अरुंधतीच्या घराच्या माणसावर संकट येऊन ठेपलं आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या कामाच्या निमित्ताने अरुंधती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलीये. त्यामुळे ती मालिकेत पाहायला मिळत नाहीये. मालिकेत दिवाळीचा ट्रॅक सुरू आहे मात्र प्रत्येकवर्षी होते तशी दिवाळी यंदा पाहायला मिळाणार नाही. कारण मालिकेत देशमुखांच्या घरी यावर्षी अरुंधती नाही, संजना आणि अनिरुद्ध घटस्फोट घेणार आहेत. तर दुसरीकडे अरुंधतीची मुलं यश आणि अभिच्या आयुष्यात सुद्धा प्रॉब्लेम्स सुरु आहेत. त्यामुळे या दिवाळीला नेहमीसारखा उत्साह पाहायला मिळणार नाही. पण दिवाळीच्या मुहूर्तावर देशमुखांच्या घरावर नवीन संकट येणार आहे. ते म्हणजे केदार. हेही वाचा - Rupali bhosale : संजनाच्या हातात कोणाचं बाळ? ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष मालिकेत सध्या केदार आणि विशाखाची मालिकेत एण्ट्री झाली आहे. विशाखा आणि केदार बऱ्याच दिवसानंतर मालिकेत परतले आहेत. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात प्रॉब्लेम्स सुरु आहे. त्यात केदारला दारूचं व्यसन लागलं आहे. त्यासाठी तो इतरांकडे पैसे मागताना किंवा गरज पडल्यास चोरताना दाखवण्यात आला आहे. मात्र मालिकेत झालेल्या या अचानक बदलामुळे प्रेक्षक नाराज आहेत.
मालिकेचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यामध्ये केदार त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दल सगळ्यांसमोर कबुली देताना दिसत आहे. तो सगळ्यांसमोर त्याने विशाखाचे पैसे चोरल्याचं कबूल करतो. त्यावर अनिरुद्ध त्याच्यावर चिडतो. ‘या परिस्थितीत केदार विशाखाच्या अंगावर हात उचलायला कमी करणार नाही.’ असं अनिरुद्ध म्हणतो. त्यावर प्रतिक्रिया देत केदार अनिरुद्धच्या अंगावर हात उचलत त्याला मारण्याची धमकी देतो. या मालिकेत आता पुढे काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
मालिकेतील अरुंधती तिच्या वैयक्तिक कारणामुळे कुठे गेली आहे का? त्यामुळे मालिकेचा ट्रॅक अचानक विशाखा आणि केदारवर वळवण्यात आला आहे का? मालिकेच्या कथानकात असा अचानक बदल का केला गेला? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत. त्या सोबतच, मालिकेत पुढे काय होणार अरुंधती आणि आशुतोष एकत्र येणार का त्यासोबतच देशमुख कुटुंबियांची विस्कटलेली घडी अरुंधती नीट करणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

)







