मुंबई, 21 ऑक्टोबर : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील खलनायिका म्हणून लोकप्रिय असलेली संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. ही मालिका दिवसेंदिवस जास्तच लोकप्रिय होत आहे. मालिकेसोबत मालिकेमधील कलाकारही प्रेक्षकांच्या मनात आपलं घर करत आहेत. संजना म्हणजेच रुपाली भोसलेनं आपल्या दमदार अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे ती सतत प्रकाश झोतात असते. अशातच रुपालीनं सोशल मीडियावर एक भक्तीमय व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. संजना म्हणजेच रुपाली भोसलेने सोशल मीडियावर एका लहान बाळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली एका लहान बाळासोबत खेळताना दिसत आहे. या बाळाचं नाव अथांग असं असून तो लहानगा तिच्यासोबत मस्त गप्पा मारत आहे. संजनासुद्धा त्या बाळासोबत दिलखुलासपणे खेळात आहे. पण हा व्हिडीओ पाहून हे बाळ नक्की कोणाचं आहे. मालिकेत येणाऱ्या भागात हे संजनाचं बाळ असणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हेही वाचा - Har Har Mahadev: सुबोध भावेंनी घेतली सुपरस्टार नागार्जुनची भेट, कारणही आहे खास रुपाली भोसलेने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे कि, ‘‘माणसानं कसं समुद्रासारखं असावं “अथांग”… भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही !’’ असं म्हणत तिने पुढे लिहिलंय कि, ‘‘हा चिमुकला सेट वर आला होता. असं म्हणतात कि लहान मुलं आई जवळ असली तर तिला सोडून ते कोणाकडेच जात नाहीत. त्याचं कारण म्हणजे त्यांना आईकडे तिचा स्पर्श, आराम आणि सुरक्षितपणा जाणवतो. एवढया वयात त्यांना काय कळतंय असं म्हणतो पण त्यांना खरंच खूप छान कळत असतं. असाच एक अनुभव मला मिळाला. मी खूप लकी आहे. या चिमुकल्याचं नाव ‘अथांग’ आहे. हा चिमुकला माझ्याकडे आला आणि मी त्याच्या पद्धतीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तो सुद्धा माझ्यासोबत छान गप्पा मारत होता. लहान मुलांची प्रचंड असल्यामुळे मला त्यांच्याशी गप्पा मारायला मला मज्जाच येते.’’ अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
आई कुठे काय करते मालिकेत संजना म्हणजेच ही तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. तिची मालिकेतील भूमिका सर्वांनाच आवडते. तिचा सोशल मीडियातील वावरही मोठा आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘खूप गोड’, ‘हे बाळ अंडी तू दोघेही खूप क्युट’, ‘तुम्ही संजनाची भूमिका खूप छान साकारता’ अशा कमेंट चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर केल्या आहेत.
तर काही चाहत्यांना मात्र हे बाळ नक्की कोणाचं आहे असा प्रश्न पडलाय. आई कुठे काय करते’ मालिकेत हे बाळ दिसणार का, संजना आई होणार का असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. मध्यंतरी मालिकेत संजना प्रेग्नेंट असल्याची शक्यता दाखवली होती म्हणून चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची वाढणारी जवळीक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. तर यशच्या आयुष्यात नवीन संकट येऊन ठेपलं आहे. आता त्याचबरोबर अरुंधतीचा दुसरा मुलगा अभिच्या आयुष्यात सुद्धा नवीन वळण येणार आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.