मुंबई, 8 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. टीआरपी रेटिंगमध्ये सतत पहिल्या पाचात असलेली आई कुठे काय करते मालिकेने नुकतेच 800 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. गेले अडीच-तीन वर्ष सुरू असलेल्या या मालिकेची लोकप्रियता आजही कायम आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. आता पुन्हा अरुंधतीसमोर एक आव्हान उभं राहणार आहे. मालिकेचा पुढच्या भागाचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. तो प्रेक्षकांची चिंता वाढवणारा आहे. सुलेखा ताई म्हणजेच आशुतोषची आई हाॅस्पिटलमध्ये भर्ती आहेत. डाॅक्टर सांगतात, त्यांना हार्ट अटॅक आलाय. आशुतोष खचून जातो. अरुंधती नितीनला म्हणते, आपण आशुतोषला एकटं पडू द्यायचं नाही. पण आता चिंताजनक अवस्थेत असलेल्या सुलेखा ताई अरुंधतीजवळ एक मागणी करणार आहेत. हॉस्पटलमध्ये अरुंधती त्यांना भेटायला जाते. तेव्हा त्या म्हणतात कि, ‘‘तू सोबत असलीस कि मला कशाचीच काळजी नाही.’’ हेही वाचा - तेजस्वी प्रकाशच्या मराठी सिनेमाचं गाणं रिलीज; दणकून नाचली अभिनेत्री, Video व्हायरल त्या पुढे अरुंधतीला म्हणतात कि, ‘‘माझ्या आशुतोषची साथ देशील ना आयुष्यभर?’ हे ऐकून अरुंधती आणि आशुतोष दोघेही आश्चर्यचकित होतात. त्यांना त्यावेळी काय उत्तर द्यावं हे अरुंधतीला समजत नाही. आता अरुंधती त्यांना नेमकं काय उत्तर देणार. ती सुलेखा ताईंची इच्छा पूर्ण करणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मालिकेत यशसुद्धा अरुंधतीला आशुतोष सोबत राहण्यासाठी हट्ट करत असतो. पण तिने त्याचं म्हणणं कधीच मनावर घेतलं नाही. आता मरणाच्या दारात उभ्या असलेल्या सुलेखा ताईंच्या इच्छेला अरुंधती मान देणार का ते बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
दरम्यान आई कुठे काय करते मालिकेत गौरी अमेरिकेला जाणार, म्हणून सगळ्यांनी तिला सेंडऑफ दिला. गौरीच्याच घरात आशुतोष, नितीन आणि देशमुख कुटुंब धमाल करतं. त्यात अनिशनं म्हटलेलं गाणं म्हणजे सोने पे सुहागा! यश मात्र खूप इमोशनल होतो. गौरी पंधरा दिवसांसाठी जाणार म्हणून तो अस्वस्थ असतो. तसंच त्याला गौरी अमेरिकेवरून पार्ट येणार नाही अशीही चिंता सतावतेय. त्याने ईशा आणि अभिषेक समोर ते बोलून दाखवलं होतं.
गौरी यशला कायमची सोडून जाणार का आणि अरुंधती हे सगळं कसं सांभाळणार हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये समजेल.आता जुनी नाती सांभाळून अरुंधती आपलं नवं नातं सुरु करणार का? ती आशुतोष सोबत लग्न करणार का हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये समजेल.