मुंबई, 29 सप्टेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यांनतर अनिरुद्ध आणि संजना यांचं लग्न ' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode ) दाखवण्यात आलं आहे. कांचन यांना अनिरुद्धचं लग्न मान्य नसल्याने त्या कायमच संजनासोबत तुसडेपणाने बोलत असतात. मात्र असं असताना देखील अरुंधती मात्र संजनासोबत चांगली वागत असल्याचे दिसत आहे. या सगळ्यानंतर आता मात्र लवकरच देशमुख कुटुंबात सुखाचे क्षण येणार आहेत. अभिषेक आणि अनघाच्या (Abhishek And Angha Marrige Photo ) लग्नाचा सोहळा रंगणार असंच दिसतं आहे. सोशल मीडियावर अनघाचा मंगळसूत्र घातलेला फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने तिचा एक साडीतील फोटो शेअर केला आहे. त्यात तिने मंगळसूत्र घातलेलं दिसत आहे. या फोटोला अश्विनीने #anagha, #aru, #abhi_anagha #aaikuthekaykarte, #ashvini_mahangade ,#actresslife, #positivevibes, #justdream, #happyness, #life असे काहीसे टॅग दिले आहेत. यावरून प्रेक्षकांनी अभिषेक आणि अनघाचे लवकरच लग्न होणार असा निष्कर्ष काढला आहे.
View this post on Instagram
अनघाचे हे फोटो पाहिल्यानंतर लवकरच अनघा अभिषेकसोबत संसाराला सुरूवात करेल असंच चित्र दिसत आहे आणि प्रेक्षकांचीदेखील तीच इच्छा आहे. या लग्नामुळे देशमुख कुटुंबात सुखाचे क्षण येणार आहेत.
हे वाचा - 'ती माझी ग्रेट भेट'; रेखा दुधाणेनं 'जीव माझा गुंतला' फेम अंतराला दिलं मोठं सरप्राईज
अभिषेक आणि अनघा यांच्या साखरपुड्याच्या दिवशी अंकिता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे दबावाखाली येऊन अभिषेक अंकितासोबत लग्न करतो. परंतु, सत्य उघडकीस आल्यावर मात्र अभिषेक अंकिताला घरातून बाहेर काढतो. त्यानंतर पुन्हा अभिषेक अनघाला एक संधी देण्याची विनंती करतो. अनघादेखील झालं गेलं विसरून अभिषेक सोबत संसार थाटण्याची स्वप्न पाहत आहे. अरुंधतीने त्यांचा निर्णय घरातल्यांना सांगितल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.प्रेक्षकही अभिषेक आणि अनघा यांचा लग्नसोहळा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हे वाचा - कोल्हापूरची म्हणून... मीराने उडवली खिल्ली; सोनाली आपला कोल्हापुरी ठसका दाखवणार?
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. आपल्या मुलांच्या आणि पतीच्या चुका पोटात घेऊन एक आई कसं सर्व सांभाळून घेते. तिचं मन किती मोठं असतं. आणि ती आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी काय-काय करत असते. मात्र तरीसुद्धा तिला स्वतःच्या अस्तित्वसाठी पावलोपावली लढावं लागतं. हे सर्व या मालिकेतून दाखविण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Tv, Tv serial