जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Har Har Mahadev: सुबोध भावेंनी घेतली सुपरस्टार नागार्जुनची भेट, कारणही आहे खास

Har Har Mahadev: सुबोध भावेंनी घेतली सुपरस्टार नागार्जुनची भेट, कारणही आहे खास

 'हर हर महादेव' चित्रपट

'हर हर महादेव' चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. आता या लिस्टमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. हा चित्रपट आहे ‘हर हर महादेव’.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. आता या लिस्टमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. हा चित्रपट आहे ‘हर हर महादेव’. मराठीमध्ये सध्या ‘हर हर महादेव’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन चालल्याचं दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रमोशच्या निमित्तानं सुबोध भावे आणि टीमने तेलगू सुपरस्टार नागार्जुनची भेट घेतली. अभिनेता सुबोध भावे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सुपरस्टार नागार्जुन भेटल्याची माहिती दिली आहे. सुबोध भावे यांनी फोटो शेअर करत लिहिलं, ‘आज “हर हर महादेव” चित्रपट सर्वदूर पोहोचवण्याच्या निमित्ताने, हैद्राबाद येथे तेलगू सुपरस्टार नागार्जुन सर यांची भेट घेतली. त्यांच्या हस्ते चित्रपटाचं तेलगू भाषेतील पोस्टर प्रकाशित करण्यात आलं’. हेही वाचा -  बॉलिवूड अभिनेत्याच्या एंट्रीसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राहुल देशपांडेंचं गाणं थांबवलं; दिली अपमानास्पद वागणूक सुबोध भावेंनी पुढे लिहिलं, समस्त तेलगू बंधू भगिनींना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी आणि शिव विचार जाणून घेण्याचे आवाहन केले. ते स्वतः छत्रपतींच्या चरीत्राने प्रभावित झाल्याचं त्यांनी सांगितलं. “हर हर महादेव” च्या संपूर्ण संघाच्या वतीने आम्ही त्यांना सिंहासनारूढ शिवछत्रपतींची मूर्ती भेट म्हणून दिली.

जाहिरात

‘मराठी चित्रपट सर्वदूर नेण्याच्या प्रयत्नाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या व लवकरच “हर हर महादेव” चित्रपट तेलगू भाषेत पाहणार असल्याचं सांगितलं. नागार्जुन सर आपले आमच्या तमाम शिव - भक्तांतर्फे मनापासून आभार मानतो’, असंही सुबोध भावेंनी म्हटलं. येत्या दिवाळीत, 25 ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांमधून आपल्या भेटीला येणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, “हर हर महादेव” चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपतींच्या भूमिकेत दिसणार असून याव्यतिरिक्त अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. सोबत सायली संजीव, अमृता खानविलकर, निशिगंधा वाड या मुख्य भूमिकेत आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर कितपद खरा उतरतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात